जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed : हौसेला मोल नाही! 15 हून अधिक देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया

Beed : हौसेला मोल नाही! 15 हून अधिक देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया

Beed : हौसेला मोल नाही! 15 हून अधिक देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया

हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. बीड शहरातील कारंजा रोड परिसरात राहणाऱ्या कापड व्यावसायिक मोमीन रिजवान यांनी देखील आपला वेगळा छंद जोपासला आहे. एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटा त्यांनी संग्रहीत केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    बीड, 22 जून : कोणाला कशाचा छंद (Hobby) असेल याचा काही नेम नाही. छंद जोपासणारे वेगवेळे अवलिया आपल्याला पहायला मिळतात. बीडमध्ये देखील असाच एक अवलिया असून देश- विदेशातील चलनी नोटा आणि नाणी (Foreign currency notes and coins) जमा करण्याचा अगळावेगळा छंड या अवलियाने जोपासला आहे. मोमीन रिजवान (Momin Rizwan)असे त्या अवलियाचे नाव असून मोमीन हे पेशाने कापड व्यावसायिक आहेत. मोमीन यांनी आतापर्यंत तब्बल 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह केला असून या नोटा आणि नाणी पाहण्यासाठी बीडकर आवर्जून येत असतात. हौसेला मोल नाही, असे म्हटले जाते. बीड शहरातील कारंजा रोड परिसरात राहणाऱ्या कापड व्यावसायिक मोमीन रिजवान यांनी देखील आपला वेगळा छंद जोपासला आहे. एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटा त्यांनी संग्रहीत केल्या आहेत. मोमीन रिजवान हे मागील वीस व वर्षापासून कापड व्यवसाय करतात. पंधरा वर्षापासून वेगवेगळे देशातील नोटा आणि नाणी एकत्र करत मोमीन यांनी आपला छंद जोपासला आहे.   वाचा :  मुलांनो, करिअर इथंही चांगलंय! मुंबई विद्यापीठाकडून ‘पाली’चे 7 कोर्सेस सुरू; कसा कराल अर्ज? VIDEO मोमीन रिजवान हे 2011 मध्ये हाज यात्रेला गेले होते. तिथे विविध देशातील नागरिक येत असतात. त्याच ठिकाणी मोमीन रिजवान यांची विविध देशातील नागरिकांची ओळख झाली. तिथूनच त्यांनी विविध देशातील नागरिकांकडून देशातील नोटा आणि नानी घेत आपला छंद जोपासला आहे.   …या देशातील चलनी नोटा आणि नाणी  मोमीन रिजवान यांनी संग्रहीत केलेल्या नोटांमध्ये इंडोनेशिया, अमेरिका ,इराण, मेक्सिको,कुवेत, सौदी अरेबिया, इराक,ओमान, दुबई,  सिंगापूर, अशा देशातील चलनी नोटा आणि नाणी आहेत. अद्यापही अनेक देशातील चलनी नोटा व नाणी संग्रह करणे बाकी असल्याचे रिजवान यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या दुकानात ठेवलेल्या नोटा आणि नाणी पाहण्यासाठी बीडकर आवर्जून येत असतात. वाचा :  MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स छंद जोपासणे आवश्यक रिकामा वेळ घालवण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस म्हणून आपण जे काही करतो त्याला छंद म्हणतात. छंद अनेक प्रकारचे असतात, प्रत्येक छंदातून आपण आनंद नक्की मिळतो. जीवनात तोच तो पणा असेल मनाला मळभ येते. हे मळभ दूर करण्यासाठी, विरंगुळा म्हणून काही छंद जोपासणे आवश्यक असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात