बीड, 21 जून : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची (beed district) ओळख आहे. दर दोन चार वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळात बीडच्या कित्येक विहिरी पार कोरड्या पडतात. पण याच शहराजवळ एक अशी विहीर आहे, जी कितीही मोठा दुष्काळ आला तरी, अजिबात आटणार नाही. शेकडो वषांर्पूर्वी एका नाविन्यपूर्ण सिंचन प्रकल्पाची निर्मिती तत्कालीन शासन व्यवस्थेद्वारा करण्यात आली. ‘खजाना विहीर’ (Khajana well beed) म्हणून ही विहीर ओळखली जाते. विहीरीला खजाना विहीर का म्हणात?, विहीरीचा इतिसाच आणि वैशिष्ट्ये या विशेष रिपोर्ट मधून पाहूया. बीड शहरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर धुळे-सोलापूर राज्य महामार्गाच्या लगत खजाना विहीर आहे. साडेतीनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणायचं काम ही खजाना विहीर करते. बीडचे मूळ नाव चंपावती नगर असे होते. मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीवर स्वारी केल्यानंतर हा भाग त्याच्या राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर त्याने चंपावती नाव बदलून भीर हे पारशी नाव दिले आणि भीरचा अपभ्रंश बीड असा झाला. भीर याचा अर्थ पाण्याचा प्रदेश असाही होतो. बीड शहराजवळच इ.स. 1572 कालखंडामध्ये विहीर बांधली गेलेली असावी असे इतिहासकार सांगतात. वाचा :
Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!
राजा भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सलामत खान याने या विहीरीची निर्मिती केली. चौकोनी दगडी चिरे व चुन्याचा वापर करुन विहीर बांधण्यांत आलेली आहे. विहीरी जमिनीपासून 23 फूट खोल आहे या विहिरीचे पाणी कायम किमान चार फूट असतेच. दोन बोगदे हे ह्या विहीरीचे इनलेट आहेत. या दोन बोगद्यांद्वारे विहिरीत पाणी येतं. तर उत्तर दिशेचा बोगदा हा आउटलेट आहे. यातून हे पाणी बाहेर जातं. विहिरीत सतत अडीच ते तीन फुट पाणी संथ व बहूधा कायम असते. अतिशय टंचाईच्या काळात देखील या विहिरीचे पाणी कांही अंशी कमी होत असले तरी ही विहिर कोरडी पडल्याचे दिसून येत नाही. खजाना विहीर नाव का पडले? शहराजवळच साधारण 1572 कालखंडामध्ये बांधली गेलेली खजाना विहीर ही भव्य जलवास्तू आहे. विहीरीचे नाव खजाना विहीर असले तरी विहीत कोणताही खजाना सापडलेला नाही. पूर्वीच्या काळात एखाद्या जिल्हा किंवा गावाला निधी मिळायचा त्याला खजाना म्हणून संबोधले जात असे. या विहीरीचा स्थापत्यकार राजा भास्कर यांना जेवढा खजाना मिळाला होता त्याने तो विहीर बांधण्यात खर्च केला. यावरुनच विहिरीला खजाना विहीर असे नाव पडले. वाचा :
Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEO
सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत भेटीची योग्य वेळ खजाना विहीर ही शहरापासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 470 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल 320 किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 175 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास तेदेखील या खजाना विहीर पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात. या ठिकाणांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नाही. खजाना विहिरी ला भेट देण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत ची योग्य वेळ आहे.
गुगल मॅपवरुन साभार खजाना विहिरीचे वैशिष्ट्ये या विहिरीचा व्यास सुमारे 50 फूट आहे, तर खोली 23.5 मीटर आहे. जमिनीपासून 17 फुटांवर विहिरीत गोलाकार वरंडाही असून त्यावर सहज फिरता येते. त्या वरंड्याखाली सहा फूट विहिर आहे. भागातील साडेचारशे एकर शेती कुठलेही उपकरण न वापरता विहिरीच्या पाण्यामुळे सिंचनाखाली आहे. या विहिरीचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो. विहिरीच्या आतील बाजूस उर्दू भाषेतील शिलालेख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







