बीड, 20 जून : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. आजही जिल्ह्यात शेकडो वर्षे जुनी हेमाडपंथी मंदिरे **(Hemadpanthi temples)**आहेत. पूर्वेकडील टेकड्यांवर वसलेले खंडोबा मंदिर हे त्यापैकी एक. तीनशे वर्षाहून अधिक इतिहास असणारे खंडोबा मंदिर (Khandoba Mandir in Beed Maharashtra) आणि त्याच्या दिपमाळीचे महत्व अधिक आहे. शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर खडकाळ डोंगरावर इतिहासाची साक्ष देत हे मंदिर उभे आहे. या मंदिराचे महत्व, इतिहास, आणि वैशिष्टे या विशेष रिपोर्टमधून पाहूया. बीड शहराला सांस्कृतिक आणि इतिहास कालीन नगरी (Historical city) म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये आजही इतिहास कालीन वास्तू आपल्याला दिसून येतात. याच इतिहास कालीन वास्तू पैकी खंडोबा मंदिर आजही दिमाखात उभे आहे. मुघलांचे शूर सरदार सुलतानजी निंबाळकर (हैबतराव) दख्खनचा सुभेदार आसेफजहॉ बहादुरच्या काळात सन 1722 ते 1751 च्या कालखंडात खंडोबा मंदिर आणि दीपमाळ उभारल्या असाव्यात असे इतिहासकार सांगतात. महाराष्ट्रात असे ऐतिहासिक मंदिरे क्वचितच पाहायला मिळतात. बीड येथील खंडोबा मंदिराच्या समोरील बाजूस भव्य अशी सत्तर फुटी दीपमाळ आहे. ही दिपमाळ महाराष्ट्रात सर्वात उंच असल्याचे जाणकार सांगतात. वीट आणि चुन्याचा वापर करुन ही भव्य दिपमाळ उभारण्यात आली होती. जवळपास 300 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही दिपमाळ आजही तटस्थपणे इतिहासाची साक्ष देत उभी आहे. वाचा :
Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!
‘टेराकोटा’ शैलीतील शिल्प प्रत्येक इतिहास कालीन मंदिरावर शिल्प आढळतातच असे नाही, मात्र, बीड येथील खंडोबा मंदिरासमोरील दीपमाळेवर टेराकोटा शैलीतील शिल्पांनी अलंकृत केलेले चित्तवेधक शिल्प आहेत. दिपमाळेच्या प्रवेशद्वारावर गणेश नागदेवता आधी महत्वपूर्ण शिल्प आहेत. या शिल्पांवर ग्रीक युद्धांचा परिणाम झालेला दिसतो. पशुपक्ष्यांचे देखील शिल्प दिपमाळेवर कोरण्यात आली आहेत. दीपमाळेवर शिल्पा शिवाय अतिशी सुंदर अशा चित्रांचे रेखाटण्यात करण्यात आले असून आजही या चित्रातील रंग थळकपणे दिसतात. दोन देह मात्र, एकच तोंड असणाऱ्या बैलाचे शिल्प देखील अधिकच आकर्षक करणारे आहे. कसे पोहोचाल खंडोबा मंदिरात? खंडोबा मंदिर हे शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 450 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल 300 किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 150 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेसदेखील इथंपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास ते देखील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात. या ठिकाणांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तिकीट नाही.
गुगल मॅपवरून साभार
वाचा : Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEO चंपाषष्टी सोहळ्याला मंदिरात गर्दी सोमवती अमावस्या आणि चंपाषष्टी सोहळ्याला खंडोबा मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यानिमित्त धार्मिक महोत्सवाचे आयोजन आणि भव्य अशी आरती देखील करण्यात येते. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते.