जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पती आहे की आणखी कोण? पत्नीला अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

पती आहे की आणखी कोण? पत्नीला अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

पती आहे की आणखी कोण? पत्नीला अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

स्वत:च्याच पत्नीला अनोळखीच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना बीडचा माजलगाव शहरात झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 06 नोव्हेंबर : स्वत:च्याच पत्नीला अनोळखीच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना बीडचा माजलगाव शहरात झाली. याप्रकरणी पती आणि नराधम व्यक्ती विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाशेद इनामदार व नासेर शेख (महिलेचा पती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

माजलगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नामक व्यक्ती घुसला व त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘तेरे बिना मरजावां…’ गाण्यावर रील बनवून शेअर केली, मग गर्लफ्रेंडच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

हा प्रकार अनेक दिवस घडत होता. दरम्यान यावेळी विवाहितेचा पती नासेर शेख हा घरातून निघून जात होता. बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान पीडित महिलेने या अन्यायाला प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन वाचा फोडली. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत.

13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. प्रमोद सोमनाथ सलगर (रा. मुंगी ता. धारुर जि. बीड) असं नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जाहिरात

या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. (दि. 22) ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. यानंतर पिडीत मुलगीचा शोध घेण्यात पोलिसांना यश  आले.

हे ही वाचा :  वाळू तस्करांनी केला जीवे मारण्याचा प्रयत्न, बचावासाठी तहसीलदाराने बंदूक काढली अन्…, भंडाऱ्यातील थरार

जाहिरात

यादरम्यान पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जाबाबात म्हटलंय की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमुद गुन्हयात 376 (2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4, 6, 17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed , beed news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात