रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 8 मार्च: 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी विविध संस्था किंवा शासन स्तरावरून नवनवीन उपक्रम राबवले जातात. बीड जिल्ह्यात देखील जिल्हा रुग्णालयामध्ये महिला दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस विविध उपक्रम घेण्यात येत असून आनंदनगरी या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रुग्णालयात महिला सप्ताह महिला दिनाच्या औचित्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात 3 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आनंदनगरीचे आयोजन अनोखे ठरले. आनंदनगरीच्या माध्यमातून रुग्णालय परिसरात खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले.
आनंदनगरीत खाऊ गल्ली आनंदनगरीमध्ये डॉक्टर आणि परिचाराकांनी सहभाग घेतला. यामध्ये कर्मचारी महिलांनी घरगुती पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले होते. ते या ठिकाणी विक्री देखील केली. विशेष म्हणजे सर्वाधिक जीवनसत्त्व असणारे भरडधान्याच्या माध्यमातून या पदार्थांची मेजवानी तयार केली होती. Women’s Day 2023 : कडू निंबोळीने संसारात पेरला गोडवा! 30 महिलांनी एकत्र येत सुरु केला उद्योग, पाहा Video विविध पदार्थांची मेजवानी यामध्ये सॅलड, दही, मुगाचा शिरा, आंबील, सर्व मिक्स धान्याची भाकरी, विविध कडधान्य एकत्र करीत तयार केलेले पिठलं, अशा प्रकारच्या पदार्थाचे होते त्यामुळे या आनंदनगरीचा डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांनी देखील लाभ घेतला.