जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक; गळा कापून 32 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत फेकला, बीडमध्ये खळबळ

धक्कादायक; गळा कापून 32 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत फेकला, बीडमध्ये खळबळ

घटनास्थळाचा फोटो

घटनास्थळाचा फोटो

बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Local18 Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 14 एप्रिल : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. हत्या, आर्थिक फसवणुकीचे प्रकार, अनैतिक संबंधातून आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 32 वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत फेकल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे संपूर्ण घटना - बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. गळा कापून एका 32 वर्षीय महिलेचा मृत्तदेह विहिरीत फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुक्कडगाव परिसरात उघडकीस आली आहे. कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतात विहिर आहे. या विहिरीमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली होती. मृतदेह बाहेर काढला असून अंदाजे 30 ते 32 वर्षाच्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळा चिरुन मृत्तदेह विहिरीत फेकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पिंपळनेर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तसेच नेमका खून कोणी केला? याचा तपास सुरू आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात