Home /News /maharashtra /

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले, केला मोठा खुलासा

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले, केला मोठा खुलासा

पूजा चव्हाण हिचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले असून त्यांनी आपल्या मुलीबाबत घडलेल्या या घटनेविषयी भाष्य केलं आहे.

मुंबई, 14 फेब्रुवारी : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर राज्यभर चर्चा झाली. कारण या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका बड्या मंत्र्यांचं नाव समोर आलं. त्यामुळे पूजाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलण्यामागे नेमकं कारण काय होतं, याबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र आता पूजा चव्हाण हिचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले असून त्यांनी आपल्या मुलीबाबत घडलेल्या या घटनेविषयी भाष्य केलं आहे. माझ्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी केलं आहे. 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या एक्स्क्लुसिव्ह मुलाखतीत पूजाच्या वडिलांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. पोल्ट्रीमध्ये झालेल्या नुकसानीमुळं पूजा काहीशी ताणात असल्याचा खुलासा तिच्या वडिलांनी केला आहे. तसंच तिच्यावर मानसिक उपचारही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजाच्या वडिलांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करणंही टाळलं. 'पूजावर सुरू होते मानसिक उपचार' पूजावर गेल्या काही दिवसांपासून मानसिक उपचार सुरू होते, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. तसंच या प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याबाबत होत असलेल्या चर्चांवरही उत्तर दिलं आहे. 'आमचा कोणावरही संशय नाही. संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका. पूजाचे कोणासोबतही संबंध नाही. कुटुंबावर कोणाचाही दबाव नाही,' असंही पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी म्हटलं आहे. हेही वाचा - तरुणीच्या आत्महत्येनंतर शिवसेना मंत्र्यावर गंभीर आरोप, अखेर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन दरम्यान, पूजा चव्हाण हिच्या बहिणीने मात्र वेगळीच शंका उपस्थित केली होती. पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे की, 'माझी बहिण वाघिण होती, ती असं करू शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल. दोन दिवसांपासून मी पाहात आहे की तुम्ही काहीही पोस्ट टाकत आहात. काही विचारपूस न करता. फक्त परळी वैजनाथची नाहीतर पूर्ण महाराष्ट्राची वाघिण होती माझी बहीण. पूजा लहू चव्हाण एवढी कमजोर नव्हती की असं काही करेल आणि हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे.'
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed, Suicide case

पुढील बातम्या