मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अपघाताचा एक क्षण आणि अख्खं कुटुंब उद्धवस्त; पती जागीच ठार, मुलगी आणि पत्नी गंभीर

अपघाताचा एक क्षण आणि अख्खं कुटुंब उद्धवस्त; पती जागीच ठार, मुलगी आणि पत्नी गंभीर

अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला असून त्याची मुलगी आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला असून त्याची मुलगी आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला असून त्याची मुलगी आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

बीड, 9 जानेवारी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला असून त्याची मुलगी आणि पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोखरी गावाजवळ पिकअपच्या धडकेत मोटारसायकलवरील कानिफ भिमराव वांढरे हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. यात

मोटरसायकलवर असलेली पत्नी व मुलगी गंभीर जखमी आहे. जखमी मुलगी आणि पत्नीवर अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा पोखरी येथे कुकुटपालन व्यवसाय आहे. काल रात्री कानिफ वांढरे हे पत्नी सोनाली ( 30 ) आणि मुलगी संस्कृती (9) यांच्यासोबत दुचाकीवरून गावाकडून पोखरी येथे जात होते. मात्र गावाजवळ एका भरधाव पिकअपने त्यांच्या मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कानिफ वांढरे जागीच ठार झाले. घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी धाव घेत गंभीर जखमी सोनाली वांढरे व संस्कृती वांढरे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले आहे.

दरम्यान, अपघाताने वांढरे कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावून नेला आणि पत्नीसह चिमुकलीही मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्घटनेमुळे वांढरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Beed, Road accident