बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका, पुणे जिल्ह्यातील घटना

बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका, पुणे जिल्ह्यातील घटना

याप्रकरणी आरोपीला जामीन तर मिळालाच, पण फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीच्या न्यायालयाने पोलिसांना दिले.

  • Share this:

इंदापूर, 30 जून : कायद्याचा गैरवापर केल्याच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात. अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातही घडली आहे. महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा खोटा आरोप करत तक्रार दिली होती. मात्र आता याप्रकरणी आरोपीला जामीन तर मिळालाच, पण फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीच्या न्यायालयाने पोलिसांना दिले.

इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील एका महिलेने वालचंदनगर पोलीस ठाण्यात आरोपीचे उसने घेतलेले पैसे मिळत नाही म्हणून आरोपीने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद वालचंदनगर पोलिसात दिली. पोलिसात आरोपीविरूध्द गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला.

दरम्यान, आरोपीने बारामतीच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. पोलिसांचा तपास सुरू असताना फिर्यादीने आपल्या जबाबात बलात्कार झालाच नाही असे लेखी जबाबाचे प्रतिज्ञा पत्र दिले आणि या गुन्ह्याला वेगळेच वळण लागले.

आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना या बाबतची फिर्यादीची विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. संबंधीत महिलेने खोटा गुन्हा दाखल करुन पोलीस आणि न्याय व्यवस्थेचा वेळ वाया घालवला म्हणून न्यायालयाने फिर्यादीवर कडक आणि कठोर कारवाईचे आदेश बारामतीचे न्यायधीश आर. आर. राठी यांनी दिले.

First published: June 30, 2020, 11:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading