जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डी साईनाथांच्या चरणी दानात आलेल्या नाण्यांचा खच; इतक्या नाण्यांचं करायचं तरी काय? बँकाही झाल्या हैराण

शिर्डी साईनाथांच्या चरणी दानात आलेल्या नाण्यांचा खच; इतक्या नाण्यांचं करायचं तरी काय? बँकाही झाल्या हैराण

दानात आलेल्या नाण्यांचा खच

दानात आलेल्या नाण्यांचा खच

आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून स्वइच्छेप्रमाणे दानपेटीत दान देतात. पण आता हेच दान देण्यामुळे बँकाही हैराण होऊन गेल्या आहेत. पण का? जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल: केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण जगातील कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत म्हणजे शिर्डीचे साईबाबा. म्हणूनच शिर्डीच्या साई मंदिरात वर्षाचे सर्व दिवस भक्तांची गर्दी असते. साईनाथ महाराजांचं दर्शन व्हावं यासाठी अनेक भक्त दूरवरून दर्शसनासाठी येतात. तसंच मंदिराच्या बांधकामासाठी किंवा अन्नदानासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून स्वइच्छेप्रमाणे दानपेटीत दान देतात. पण आता हेच दान देण्यामुळे बँकाही हैराण होऊन गेल्या आहेत. पण का? जाणून घेऊया. पाऊस गेला पण आता उकाडा करणार घायाळ, विदर्भ 43 पार जे भक्त दानपेटीत आपलं दान अर्पण करत असतात यापैकी बहुतांश भक्त नाण्यांच्या स्वरूपात आपलं दान देतात. त्यामुळे शिर्डी साई संस्थानाकडे कोट्यवधीजी रुपयांचे नाणे येत असतात. हे पैसे आणि नाणे संस्थांकडून बँकेत जमा करण्यात येतात. आठवड्यात सात लाख तर वर्षभरात साडेतीन कोटी रूपयांची नाणी दानपेटीत निघतात. पण आता ही रक्कम इतकी मोठी आहे की बँकांनीही नाणे स्वीकरण्यास असमर्थता दर्शवली आहे. काही बँकांकडे तर कोट्यवधी रूपात तसेच पडून आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

साईबाबा संस्थानचे जवळपास 13 विविध बँकेत खाते असून आठवड्यातून दोनदा दानाची मोजदाद होत असते. बँका हे सर्व पैसे आणी नाणी घेऊन जातात. आता मात्र बँकांना नाण्यांचा भार सोसवत नाहीए. प्रत्येक बँकेकडे जवळपास दोन कोटी रूपयांची नाणी तशीच पडून असल्याने चार बँकांनी तर पैसे स्विकारण्यास असर्मथता दर्शवली आहे. म्हणूनच आता दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साईसंस्थान पुढे प्रश्न निर्माण होणार असून यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात