23 मे : पुण्यातील वाहतुकीची समस्या ही गेली अनेक वर्ष चर्चेचा विषय त्यासाठी पोलिसांच्या, रस्त्यांच्या चुका ,चुकीचे सिग्नल अश्या अनेक गोष्टींवर आपण बोलतो… पण हे सगळं कुणामुळे होत? काय आपोआप गाड्या चालतात… नाही ना… मग पुण्याचं ट्रॅफिक असं का ? पाहा हा स्पेशल रिपोर्ट,“मैं ऐसा क्युँ हूँ???” नमस्कार… मी पुण्याचं ट्रॅफिक बोलतोय… तुम्ही सिग्नलला उभे राहून माझ्या नावाने रोज ओरडता, मी तुम्हाला नको नको केलंय म्हणताय. माझ्यात सुधारणा करण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर परिषदा भरवताय. अरे पण मी इतका वाईट का ते कोण पाहणार. कोण जबाबदार आहे माझ्या या स्थितीला. कधी विचार केलाय याचा? तुम्ही पुणेकर रोज मला सकाळ संध्याकाळ उठता बसता शिव्या देता आणि त्याच वेळी झेब्रावर जाऊन उभे राहताय, सिग्नल तोडताय. राँग साईडने गेलं तर काय होतंय म्हणत तोंडवर करुन जाता. रस्त्यावरुन भर्रकन जाता आलं नाही तर तर फुटपाथवरून गाड्या घालता. तुम्हाला डोक्यावर हेल्मेट घालायचा अपमान वाटतो. अरे मरताय ना… तरी सुद्धा सुधरत नाही आणि वर माझ्या नावाने खडे फोडताय. जरा विचार करा… का मी असा आहे? क्यु मैं ऐसा हुँ??? शुक्रवारी रात्री चांदणी चौकात झालेल्या तुमच्याच एका नातेवाईकाच्या अपघातामुळे परत सगळ्या वर्तनमानपत्रांनी, माध्यमांनी मला सुधरायची गरज आहे असं लिहिलं. अरे, पण मी कुठे नाही म्हणतोय की धडकल्यावर आम्हाला काही होत नाही… किंवा आम्ही पडतच नाही अशी तुमची पोलिसांना उत्तर… पुण्याचं मी ट्रॅफिक… माझ्या या अवस्थेला जेव्हडे पुणेकर जबाबदार आहे तर तेव्हडेच ट्रॅफिक पोलिसही जबाबदार आहेत. हो ते ही… ज्या शहरात 31 लाख दुचाकी आणि 17 लाख चारचाकी गाड्या आहेत. त्या शहराला नियम शिकवायला 1200 ट्रॅफिक पोलीस केस पुरे पडतील. त्यात तुमचा शहाणपणा आडवा येतोच की नियम समजून घ्यायला आणि ते पाळायला. फक्त जन्माने पुणेकर नाही, तर व्यवसाय कामानिमित्त परराज्यातल्या लोकांनाही तुमच्या ट्रॅफिकच्या बेशिस्तपणाचे धडे देऊन त्यांनाही त्यात पारंगत करता. अहो, मी तुमच्यावर जर आरोप करतोय तर या IBN लोकमच्या प्रतिनिधीलाच विचारा.. तो ही साक्षीदार आहे.. पुणेकरांनो विद्येचं माहेरघर म्हणून तुम्ही शेखी मिरवता आणि त्याच पुण्यात वाहतुकीच्या नियमांचं ज्ञान घ्यायला विसरता. भाषेचा, संस्कृतीचा, अगदी मस्तानी आईस्किमचाही माज मिरवता. मग हाच माज वाहतुकीचे नियम मिरवण्यातही असू द्या. ज्या दिवशी हाही माज मिरवाल त्या दिवशी 1200 ट्रॅफिक पोलिसही पुरतील आणि पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 1 तासही भरपूर वाटेल. तुमचा कृपाभिलाषी पुण्याचं ट्रॅफिक…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.