औरंगाबाद, 24 जून : उर्दू भाषा ही गोड भाषा म्हणून ओळखले जाते. उर्दू भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगलं महत्त्व आहे. यामुळे उर्दू भाषेतील (Urdu Language) नोकरी देखील चांगल्या आहेत. तुम्हाला उर्दू भाषा शिकून यात करिअर (Career) करायचा विचार करत असाल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. या साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उर्दू विभाग (Urdu language in university of Bamu Aurangabad) म्हणून एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. चला तर मग उर्दू भाषा शिकण्यासाठी काय करावे लागेल थोडक्यात माहिती जाणून घेऊया… डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा भाषा भवन म्हणून एक विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागांमध्ये उर्दू विभाग म्हणून एका विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून दोन वर्षाचे एमए उर्दूचे शिक्षण दिले जाते. या विभागांमध्ये 40 विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. विभागात दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत. त्या पुस्तकाचा वापर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात होतो. यासोबतच तज्ञ शिक्षक स्टाफ असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. वाचा :
Career After 10th: दहावीनंतर पॉलिटेक्निक आहे बेस्ट पर्याय; या स्ट्रीममध्ये आहेत करिअरची मोठी संधी
प्रेवश कसा घ्यायचा? उर्दू भाषा विभागांमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर या विभागाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार सुरू होते. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची तारीख विद्यापीठ जाहीर करते. तारीख जाहीर केल्याची माहिती तुम्हाला वर्तमानपत्रातून घेता येऊ शकते. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्र टीसी मूळ प्रत, दहावी, बारावीचे मार्क शीट पदवीचे गुणपत्रक तुम्ही जर इतर विद्यापीठातून स्थलांतरित झाला असेल तर स्थलांतरित प्रमाणपत्र गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? उर्दू भाषा विभागांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. यासाठी विद्यापीठाच्या नियमानुसार प्रवेश दिला जातो. विद्यापीठाची सुसज्ज अशी लायब्ररी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनासाठी वापरता येऊ शकते. शासकीय नियमानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध आहे. वाचा :
10वी, 12वीनंतर कोणता कोर्स निवडावा? अजूनही कन्फ्युज आहात? चिंता नको; ‘या’ टिप्समुळे घ्याल परफेक्ट निर्णय
कुठे शिकवला जाणार हा कोर्स ? बेगमपुरा भागामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 30 बिल्डिंग पासून काही अंतरावर भाषा भवन म्हणून एक इमारत आहे या इमारतीमध्ये उर्दू विभाग आहे. विभागाचा ई-मेल आयडी head.urdu@bamu.ac.in यावर संपर्क साधू शकता. तसेच W838+W6X, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, औरंगाबाद, महाराष्ट्र 431004 हा विभागाचा पत्ता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
http://www.bamu.ac.in/
वेबसाइटवर तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.
गुगल मॅपवरून साभार…
शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? उर्दू विभागात शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही शिक्षक, लेखक,कवी,कादंबरीकार,पत्रकार, आकाशवाणी यासारख्या माध्यमांमध्ये काम करू शकता. यामध्ये तुम्हाला 20 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी उर्दू विभागांमध्ये शाळा प्राथमिक, कनिष्ठ महाविद्यालय, आकाशवाणी, दैनिकांचे कार्यालय, फिल्म सिटी मुंबई, हैदराबाद गाणे लिहिणे, ई टिव्ही उर्दू व रेडिओ जॉकी साठी कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांची निवड केली जाते.