जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादमध्ये पेटणार धगधगती मशाल, उद्धव ठाकरे उद्यापासून दौऱ्यावर

औरंगाबादमध्ये पेटणार धगधगती मशाल, उद्धव ठाकरे उद्यापासून दौऱ्यावर

औरंगाबादमध्ये पेटणार धगधगती मशाल, उद्धव ठाकरे उद्यापासून दौऱ्यावर

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 22 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्यापासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असंही म्हटलं जात आहे. BREAKING : CBI साठी महाराष्ट्राचे दार मोकळे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मविआचा धक्का शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उद्या रविवारी 23 ऑक्टोबर 22 रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत, असंही सांगितलं जात आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरीमुळे मोठी गळती लागली आहे. आताही, मिलिंद नार्वेकर यांच्या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आता संपत आली आहे, 4 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला नारायण राणे हजर होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना राणेंनी मोठा दावा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात