Home /News /maharashtra /

Aurngabad : औरंगाबादचे 'ताजमहाल' पाण्याविना कोरडेठाक, पर्यटक संतापले, VIDEO

Aurngabad : औरंगाबादचे 'ताजमहाल' पाण्याविना कोरडेठाक, पर्यटक संतापले, VIDEO

title=

औरंगाबादमध्ये प्रसिद्ध असा 'बीबी का मकबरा' (Bibi Ka Maqbara) आहे. तो पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. त्यांच्याकडून हे ठिकाणी पाहण्यासाठी पैसे आकारले जातात. परंतु, तिथं पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद 6 जून : दख्खनचा दगडी ताजमहल (Dagdi Taj Mahal) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या औरंगाबाद शहरातील 'बीबी का मकबरा' (Bibi Ka Maqbara) या प्रेक्षणीय स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून रितसर तिकिटाचे पैसे आकारले जातात. मात्र, त्यांना योग्य त्या कोणत्याची सुविधा पुरवल्या जात नाहीत. कारण, येथे कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना देखील पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. आग्र्याचा ताज महालच्या धरतीवर 'बीबी का मकबरा'ची निर्मिती करण्यात आली होती. सुंदर अशी वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. परंतु, प्रशासनाकडून साधी पिण्याच्या पाण्याची सोयदेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्यावाचून गैरसोय होताना दिसत आहे. वाचा : Bachelor Party करण्यासाठी खास मुलींसाठी टॉप 5 डेस्टिनेशन्स! या गैरसोयीबद्दल पर्यटक सुरेश मोरे सांगतात की, "आम्ही गुजरातमधून बीबी का मकबरा पाहण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आलो. ऐतिहासिक वारसा म्हणून मकबारा खूप सुंदर आहे. तिथलं सौंदर्य पाहून आम्ही भारावून गेलो. अशी वास्तू आम्ही अगोदर कुठेच बघितली नाही. पण, या ठिकाणी एका गोष्टीची कमतरता आहे. ती म्हणजे तिकीट काढूनही पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे परराज्यातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पर्यटकांकडून पैसे आकारले जात असतील, तर त्यांनी सुविधा देणं गरजेचे आहे", असे मत सुरेश मोरे यांनी दिली. 'बीबी का मकबरा' या स्थळाचा इतिहास १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजबाने 'बीबी का मकबरा'ची निर्मिती केलेली होती. इतिहासकारांच्या मते ही कबर मुघल सम्राट औरंगजेबाने त्याची पत्नी दिलरस बानो बेगम हिच्या स्मरणार्थ बांधली आहे. त्यांना राबिया-उद-दौरानी या नावानेही ओळखले जात होते. ते ताजमहालच्या धर्तीवर बांधले गेले. हे कबर अकबर आणि शाहजहानच्या काळातील शाही बांधकामापासून शेवटच्या मुघलांच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. ही वास्तू मुघल काळात औरंगाबाद शहराच्या मध्यभागी असायची. या कबरीमधून औरंगजेबाच्या स्थापत्य शैलीच्या दृष्टीकोनाची संदर्भातील माहिती मिळते. Bibi ka maqbara

    गुगल मॅपवरून साभार...

    हे ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासंबंधीची माहिती ऐतिहासिक असणारा हा 'बीबी का मकबरा' औरंगाबाद शहरातील बेगमपुरा भागामध्ये आहे. येथे लहान मुलांपासून सर्व वयाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. हे ठिकाण सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले सुरू असते. भारतीय नागरिकांना 25 रुपये, लहान मुलांना 10 रुपये, तर विदेशी पर्यटकांना 300 रुपये तिकीट दर आकारण्यात येतात. हे ठिकाण विमानतळापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे, तर औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि औरंगाबाद शहरापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी खासगी टॅक्सी किंवा बसेस जातात.
    First published:

    पुढील बातम्या