मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Soyagaon Nagar Panchayat Election Result: अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना 'जोर का झटका', सोयगाव नगरपंचायत शिवसेनेच्या खिशात

Soyagaon Nagar Panchayat Election Result: अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना 'जोर का झटका', सोयगाव नगरपंचायत शिवसेनेच्या खिशात

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता.

  औरंगाबाद, 19 जानेवारी : राज्यातील सार्वत्रिक नगरपंचायत निवडणुकीचे निकाल (Soyagaon Nagar Panchayat Election Result) आज जाहीर होत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून ते कॅबिनेट मंत्र्यांनी या निवडणुकीत जोर लावला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या दरम्यान औरंगाबाद येथून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Central Minister Raosaheb Danve) यांना शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जोराचा झटका दिला आहे. कारण सोयगाव नगरपंचायतीत आपण जिंकणार असा दावा करणाऱ्या दानवेंना (Abdul Sattar vs Raosaheb Danve) या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवेसेनेला 17 पैकी तब्बल 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

  सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे दोन दिग्गज नेते आमनेसामने होते. याशिवाय एकेकाळी मित्रपक्ष असलेले दोन कट्टर हिंदुत्ववादी पक्ष यावेळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. दोन्ही बाजूने तगडी फिल्डिंग लावली जात होती. पण या निवडणुकीत भाजपचं पारडं कमी पडलेलं दिसलं आहे.

  अखेरच्या क्षणी निकाल पालटला, कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचा 'दे धक्का'

  वॉर्डनिहाय कोण-कोण जिंकलं?

  वॉर्ड क्र. 1 शाहिस्ताबी राउफ, शिवसेना

  वॉर्ड क्र. 2 शिवसेना अक्षय काळे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 3 दीपक पगारे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 4 हर्षल काळे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 5 वर्षा घनघाव, भाजप

  वॉर्ड क्र. 6 संध्या मापारी, शिवसेना

  वॉर्ड क्र. 7 सविता जावळे, भाजप

  वॉर्ड क्र. 8 कुसुम दुतोंडे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 9 सुरेखा काळे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 10 संतोष बोडखे, शिवसेना

  वॉर्ड क्र. 11 संदीप सुरडकर, भाजप

  वॉर्ड क्र. 12 भगवान जोहरे, भाजप

  वॉर्ड क्र. 13 ममता बाई इंगळे, भाजप

  वॉर्ड क्र. 14 कदिर शहा, भाजप

  वॉर्ड क्र. 15 सुलताना रौफ देशमुख, भाजप

  First published:

  Tags: BJP, Maharashtra News, Raosaheb Danve, Sarpanch election, Shiv sena