Home /News /maharashtra /

Aurangabad : 'फ्रिज अन् पाण्याच्या जार'मुळे कुंभार व्यावसायिक कोलमडला, ऐका त्यांच्याच तोंडून 'ही' कर्म कहाणी!

Aurangabad : 'फ्रिज अन् पाण्याच्या जार'मुळे कुंभार व्यावसायिक कोलमडला, ऐका त्यांच्याच तोंडून 'ही' कर्म कहाणी!

title=

कोरोना महामारीनंतर काही व्यवसाय पूर्ववत होत आहेत. पण, काही व्यवसायांना अजुनही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनानंतर कुंभार व्यवसायिकांनाही अशाच आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कारण, माती महागली आहे.

    औरंगाबाद, 9 जून : "कोरोनाचा काळ संपल्यानंतर इतर व्यवसायाप्रमाणे आमचा कुंभार व्यवसाय (Potter Business) रुळावर येईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर दोन-तीन लाखांचा माल घेऊन व्यवसाय थाटला होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिक फ्रिजच्या पाण्याला पसंती देत आहेत. यामुळे उन्हाळा गेला तरी, आमचा व्यवसाय पूर्ण झाला नाही. तयार केलेल्या मालाच्या तुलनेत 60 टक्के मालाची विक्री झाली, तर 40 टक्के माल आमच्याकडे पडून आहे. यावर्षी जवळपास 2 लाखांचे नुकसान झाले आहे", ही कर्मकहाणी कुंभार व्यवसायिक अशोक कानपुंडे यांनी News18 Lokmat समोर कथन केली. (Potter business in financial crisis) भारतात अनेक वर्षांपासून थंडगार पाणी पिण्यासाठी माठांचा वापर केला जातो. हे माठ मातीपासून तयार केले जातात. यामध्ये मिनरल आणि पौष्टिक घटकांचा समावेश असतो. या अशा अनेक गोष्टींमुळे मागील अनेक वर्षांपासून भारतामध्ये थंडगार पाणी पिण्यासाठी माठांचा वापर केला जातो. शरीरासाठी फायदेशीर असलेला हा माठ मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मागे पडत चालला आहे. प्रत्येक घरामध्ये फ्रिज आले, त्यासोबतच पाण्याची प्लांट तयार झाल्याने 10 रुपयांमध्ये पाण्याचा जार मिळू लागला. याचा थेट परिणाम कुमार व्यवसायव र झालेला दिसून येत आहे. वाचा : 7 वर्षे Facebook Friend अन् बांधली लग्नगाठ; 15 दिवसानंतर बायकोमुळे तरुणाचं धक्कादायक पाऊल  अशोक कानपुंडे आपल्या व्यवसायाबद्दल सांगतात की, "मागील अनेक वर्षांपासून आम्ही हा कुंभार व्यवसाय करतो. आमची ही पाचवी पिढी आहे. या व्यवसायासाठी आमच्या घरातील सर्व सदस्य काम करतात आणि यावरच आमचं कुटुंब अवलंबून आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. आमचे प्रचंड नुकसान झाले. हळुहळु लाॅकडाऊन उठवलं गेलं आणि सर्वच व्यवसाय सुरू होत गेले. यासोबत आमचा व्यवसायदेखील सुरू झाला. इतर व्यवसायांप्रमाणे आमचा व्यवसाय रुळावर येईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अनेक नागरिक फ्रिज आणि पाण्याचा जारचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी माठांची विक्री कमी प्रमाणात झाली आहे." वाचा : अभिमानास्पद! 11 वर्षीय वाणी बनली जगातली सर्वांत लहान लेखिका, एका वर्षात 5 विश्वविक्रम कुभांर व्यवसायिक कुसुमबाई कासारे सांगतात की, "पूर्वीपासून आम्ही हा व्यवसाय करतो. महागाई दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी काळी 2 हजार रुपये भरून मिळणारी माती आता 5 हजार रुपयांवर गेली आहे. आम्हाला कच्चा माल महाग मिळत असल्यामुळे आम्हाला माठांच्या किमतीदेखील वाढवावे लागल्या. याचा मोठा परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आणि मोठे नुकसान झाले." माठातील पाणी प्यायल्याने काय होतात फायदे? माठा पाण्यामध्ये मिनरल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते. यामुळे मातीच्या मठातील गुणधर्म आपल्या शरीराला पोषक असतात. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचा समस्येला माठातील पाणी हे उपायकारक आहे. सर्दी खोकला झाल्यास फ्रिजमधले पाणी पिऊ नका, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यावर माठातील पाणी पिणे, हा चांगला उपाय आहे.
    First published:

    पुढील बातम्या