औरंगाबाद, 25 जानेवारी : औरंगाबाद जिल्हा हा राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये असलेले पर्यटन स्थळे आहेत. यामुळे जगाच्या नकाशावरती औरंगाबाद जिल्ह्याला मोठे महत्त्व आहे. यामुळे देशभरातूनच नाही तर विदेशातून पर्यटक येत असतात. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात 6 लाख 92 हजार 586 देशी विदेशी पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट दिली आहे, अशी माहिती पुरातत्त्व शास्त्र विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी दिली आहे.
यामध्ये अजंठा लेणी 1 लाख 87 हजार 409, वेरूळ लेणी 6 लाख 92 हजार 586, बीबी का मकबरा 5 लाख 74 हजार 287, औरंगाबाद लेणी 64180, दौलताबाद किल्ला 1 लाख 85 हजार 276 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यापासून पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी सोयीसुविधाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत, असंही मिलनकुमार चावले यांनी सांगितले.
Aurangabad : 400 वर्षांपासून कधीही पाणी न आटलेलं ठिकाण, पाहा कसा झाला चमत्कार, Video
विदेशी पर्यटकांची वेरूळ लेणीला पसंती
अजंठा लेणी 1773
वेरूळ लेणी 2735
बीबी का मकबरा 1352
औरंगाबाद लेणी 159
दौलताबाद किल्ला 438 विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.
औरंगाबादचे वैभव बघून आम्ही भारावून गेलो
आम्ही दरवर्षी नियमित कुटुंबियांसोबत फिरायला निघत होतो. औरंगाबाद बद्दल आम्ही खूप ऐकलं होतं. मात्र, लॉकडाऊन मध्ये आम्हाला या ठिकाणी येता आलं नाही. आता कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. औरंगाबादचे वैभव बघून आम्ही भारावून गेलो, असं पर्यटक रोहित पटणी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18