Home /News /maharashtra /

Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता 'हा' पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO

Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता 'हा' पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO

हाॅटेल

हाॅटेल मालक मनोहर सुर्यवंशी

तरुणांच्यात स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचं स्पप्न मोठ्या प्रमाणात आहे. पण, त्यात प्रत्येक जणांना यश मिळतंच असं नाही. मनोहर सुर्यवंशी या तरुणालाही असाच अनुभव आला. त्याने हाॅटेल सुरू केलं आणि आता महिना 80000 कमवतो आहे.

    औरंगाबाद, 11 जून : "निसर्गात झालेल्या बदलामुळे शेतकरी आई-वडिलांकडे नेहमी संकट उभी राहायची. यामुळे मला शासकीय नोकरी मिळून त्यांना सुखी आयुष्य द्यायचं होतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलो. स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही. त्यासोबतच जागादेखील निघत नव्हत्या. शेवटी मोठी अडचण झाली. शहराच्या ठिकाणी छोटी चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो व्याप आता चांगला वाढला आणि आता महिन्याला 2 अधिकारांच्या पगाराएवढं उत्पन्न म्हणजेच 80 रुपये महिन्याला कमवतो", असं मनोहर विलासराव सूर्यवंशी या तरुणाने सांगितलं. (Manohar Suryavanshi is a successful hotel entrepreneur) परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कमलापूर या छोट्याशा गावातील मनोहर विलासराव सूर्यवंशी हा पदवीधर झालेला तरुण आहे. मनोहर आपला अनुभव सांगतो की, "घरी आई-वडील, 2 भावंडे आणि ८ एकर शेती; मात्र पाच वर्षांपासून दुष्काळामुळे हाती काहीच लागले नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करून सरकारी नोकरीचे स्वप्नं उराशी घेऊन त्याने 2017 ला औरंगाबाद गाठलं. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. खासगी क्लासेस लावले. शहरातील खर्च भागवण्यासाठी घरोघरी वर्तमानपत्रं टाकण्याचं काम केलं. पण, स्पर्धा परीक्षेच्या जागा निघेनात आणि दिलेल्या परीक्षांत यश येईना. जागा निघत नसल्यामुळे तरुणांमध्ये नकारात्मकतेचे वातावरण निर्माण झालं होतं. या नकारात्मक वातावरणामुळे माझीदेखील घुसमट होत होती. घरातील जबाबदारी आणि परीक्षेची ही अडचण माझ्या समोर मोठा प्रश्न निर्माण करत होती." वाचा : Business Idea: केवळ 1 लाखात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिन्याला 8 लाखांची होईल कमाई "शहरात आलो आहे तर आपण रिकाम्या हाताने परत जायचं नाही, असं मी ठरवलं. गावाकडे तर परत जायचं नाही मग काय करायचं, असा प्रश्न माझ्यासमोर होता. यातून मी चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. औरंगपुऱ्यात दुकान भाड्याने घेऊन टपरी सुरू केली. सोबतच स्पर्धा परीक्षेची पुस्तकंही विकायला आणली. हळूहळू व्यवसाय वाढला. चहाची टपरी हाॅटेलमध्ये रुपांतरीत झाली. चहाच्या हॉटेलमधून महिन्याला 70 ते 80 हजार रुपये कमाई होते. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षा सोडून पूर्णवेळ व्यवसायच करणार", असं मनोहरने सांगितलं. स्पर्धा परीक्षा हा अंतिम पर्याय नाही ग्रामीण भागातील तरुण शासकीय नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने शहरात येतात. घरची परिस्थिती नसतानादेखील काटकसर करून ते शहराच्या ठिकाणी राहातात. यातील प्रत्येक तरुणाला नोकरी लागेल याची शाश्वती नसते. यामुळे अनेकदा तरुणांकडून टोकाचे पाऊल उचलले जातात. मात्र स्पर्धा परीक्षा हा आयुष्यातील अंतिम पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेत यश येत नसेल तर याला आणखी खूप पर्याय आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव मी व्यवसाय टाकून घेतला आहे. त्यामुळे तरुणांनी स्पर्धा परीक्षेतील अपयशात खचून न जाता वेगळा पर्याय निवडून आयुष्य सुंदर करता येऊ शकतं", असंदेखील मनोहर सांगतो. "मला शासकीय अधिकारी होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं होतं. मात्र, स्पर्धा परीक्षा वेळेवर झाले नाही आणि यामुळे माझं स्वप्न पूर्ण सत्य ठरलं नाही. आता व्यवसायात उतरल्याने पूर्णवेळ व्यवसाय करणार आहे. लहान भावाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे, त्याच्यासाठी लागेल तेवढा खर्च करण्याची माझी तयारी आहे", असंही मनोहरनं सांगितलं.
    First published:

    पुढील बातम्या