मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : कसं असेल देशातील सर्वात मोठे महेश भवन? पाहा Video

Aurangabad : कसं असेल देशातील सर्वात मोठे महेश भवन? पाहा Video

X
Aurangabad

Aurangabad Mahesh Bhavan : माहेश्वरी समाज देशातील सर्वात मोठे महेश भवन उभारणार आहे.

Aurangabad Mahesh Bhavan : माहेश्वरी समाज देशातील सर्वात मोठे महेश भवन उभारणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 19 जानेवारी : औरंगाबाद शहराला पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. यासोबतच आता औरंगाबाद शहराला नवी ओळख मिळणार आहे. औरंगाबाद शहरामध्ये माहेश्वरी समाजाचं देशातील सर्वात मोठे महेश भवन माहेश्वरी सेवा ट्रस्टच्या वतीने 35 कोटीतून उभारण्यात येणार आहे. या महेश भवनाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.

कुठे होणार महेश भवन?

औरंगाबाद शहरामध्ये माहेश्वरी समाजाचे 2200 कुटुंबीय आहेत. माहेश्वरी समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी शहराच्या मध्यभागी जुनं महेश भवन आहे. मात्र ते अपुरे पडत असल्यामुळे आणि त्यासोबतच नागरिकांना सोयीचा निवारा मिळावा यासाठी सर्वात मोठे महेश भवन तयार करण्याचा निर्णय माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. यासाठी 2005 मध्ये माहेश्वरी समाजाने चिकलठाणा वसाहतीमध्ये जागा खरेदी केली. यासाठी 2015 मध्ये बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहरातील चिकलठाणा भागामध्ये 75 हजार चौरस फुटांवर या महेश भवनाचे बांधकाम सुरू करण्यात आलं. चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कामाला लॉकडाऊनमध्ये ब्रेक लागला. मात्र, काम पुन्हा सुरू झालं आणि आता अंतिम टप्प्यात आलं आहे.

कसं असेल महेश भवन?

चिकलठाणा भागामध्ये पाच मजली ही इमारत तयार होणार आहे. यामध्ये सर्व धर्माच्या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 100 खोल्या तसेच 20 हजार चौरस फुटांचा लॉन असणार आहे. सोबतच चार वातानुकूलित सभागृहे आणि 300 जणांसाठी भोजन कक्षही उभारण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठे महेश भवन 2024 मध्ये डिसेंबर पर्यंत पूर्ण तयार होणार आहे, अशी माहिती सचिव चंद्रकांत मालपाणी यांनी दिली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Local18