Home /News /maharashtra /

Success story : औरंगबादमध्ये हवा फक्त आजीचीच! नातीसोबत अभ्यास करून, 60 व्या वर्षी आजीला दहावीत मिळाले 56 टक्के

Success story : औरंगबादमध्ये हवा फक्त आजीचीच! नातीसोबत अभ्यास करून, 60 व्या वर्षी आजीला दहावीत मिळाले 56 टक्के

60

60 वर्षीय हजराबी नातीसोबत...

औरंगाबादमधील हर्सूल गावामध्ये 60 वर्षांच्या आजीने आपल्या नातीसोबत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत (10th exam) 56 टक्के मार्क्स मिळवले आहेत. बचत गटाची अध्यक्षा असूनदेखील बॅंकेचा व्यवहार येत नव्हता, म्हणून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 20 जून : "घराजवळ राहणाऱ्या बायकांसोबत बचत गट सुरू केला. बचत गटाची मी अध्यक्ष होते. यामुळे बचत गटाच्या व्यवहाराच्या नोंदी मी ठेवत होते. मात्र, अडाणी असल्यामुळे मला ते दुसऱ्यांकडून करून घ्यावं लागायचं. सुरुवातीला महिलांनी मला मदत केली. नंतर मात्र मला टाळाटाळ करू लागल्या. यामुळे आपल्यालादेखील शिक्षण आलं असतं तर लोकांना विनवण्या करण्याची गरज पडली नसती. यामुळे नातीसोबत मीदेखील दहावीची परीक्षा (10th exam) दिली. हा दहावीच्या परीक्षेत माझ्या नातीला 70 टक्के, तर मला 56 टक्के पडले", हा सर्व अनुभव नुकत्याच दहावीची परीक्षा पास झालेल्या 60 वर्षांच्या हजराबी अहमद शेख यांनी शेअर केला. (60-year-old grandmother passed the 10th exam) वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी! ही कहाणी हर्सूल परिसरामध्ये राहणाऱ्या 60 वर्षीय हजराबी अहमद शेख यांची. सिल्लोड तालुक्यातील एका खेडेगावात त्यांचे माहेर आहे. त्या सांगतात की, "घरची परिस्थिती नाजूक आई-वडील किराणा दुकान चालवून घर चालवत. या किराणा दुकानावर आई-वडील आणि तीन बहिणी आणि तीन भाऊ असा आमचा परिवार होता. मी भावंडांमध्ये सर्वात मोठी होती. घरची नाजूक परिस्थिती आणि ग्रामीण भाग, यामुळे शिक्षण घेणे शक्य झालं नाही. त्यानंतर हर्सूल येथे राहणाऱ्या अहमद यांच्याशी माझं लग्न झालं. अहमद हे ट्रक चालक असल्याने त्यांच्यावर आमचं कुटुंब चालायचं. घरात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता." अन् शाळा शिकण्याची जिद्द लागली "माझ्या पतीच्या कमाईवर आमचं संपूर्ण कुटुंब चालायचं. कमावलेले पैसे अडीअडचणीसाठी पाठीमागे असावेत, यासाठी आम्ही महिलांनी बचत गट सुरू केला. या बचत गटामध्ये परिसरातील महिला घेतल्या. 11 जणींचा बचत गटाची मी अध्यक्ष होते. यामुळे या बचत गटाचे सर्व व्यवहार मलाच बघायला लागायचे. महिलांचे पैसे गोळा करणे, जमा झालेले पैसे बँकेत नेऊन भरणे ही माझी जबाबदारी होती. मी अडाणी असल्यामुळे मला लिहिण्या-वाचण्याची अडचण येत होती. त्यामुळे मला इतरांची मदत घ्यावी लागायची. सुरुवातीला महिलांनी मला मदत केली. मात्र, नंतर त्या टाळाटाळ करू लागल्या. यामुळे मला अडचणी आल्या. मला पश्चाताप झाला आपण जर शिक्षण केलं असतं तर कोणाकडे विनवण्या करण्याची गरज पडली नसती. तेव्हा पहिल्यांदा शिक्षण घेण्याचा विचार पुन्हा मनात आला." ...आणि पूर्ण झाले आयुष्याचे स्वप्नं हजराबी पुढे सांगतात की, "माझ्या पतीला हा विचार बोलून दाखवला. क्षणाचा विचार न करता पतीने होकार दिला. घरासमोर असलेल्या शाळेमध्ये मी शिक्षण घेऊ लागले. त्यानंतर शहरांमध्ये असलेल्या एका शाळेत प्रवेश घेऊन मी दहावीची परीक्षा दिली. पहिला पेपर मराठीचा होता. मराठी ऐकण्यात बोलण्यात आले असल्यामुळे मला पहिला पेपर सोपा गेला. मात्र, दुसरा पेपर इंग्रजीचा होता. या इंग्रजीचा आणि माझा कधीच संबंध आला नव्हता. यामुळे या परीक्षेला जाताना मला प्रचंड भीती वाटत होती. पेपर दिला तो थोडा अवघड गेला. त्यानंतरचे सगळे पेपर चांगले गेले. निकालदिवशी सकाळपासूनच माझ्या मनात धडधड सुरू होती. दुपारी 1 वाजता नातीने माझा निकाल बघितला तेव्हा मी पास झाले होते. त्यानंतर तिने तिचा बघितला, त्यामुळे दोघी आम्ही पास झालो. दहावीची परीक्षा पास झाल्यामुळे माझ्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण झालं", असा अनुभव हजराबी सांगतात. वाचा : Success Story : संसार सांभाळत नाशिकच्या नीलाक्षी लोही ठरल्या ‘मिसेस वेस्ट इंडिया’च्या विजेत्या, अशी घेतली मेहनत, पहा VIDEO यासंदर्भात पती अहमद म्हणाले की, "पत्नी आणि नात एकच वेळी पास झाल्याचा आनंद खूप आहे. पत्नीच्या आई-वडिलांना ही गोष्ट समजल्यानंतरही त्यांनाही खूप आनंद झाला. या वयात घरातील सगळी जबाबदारी सांभाळून कसलाही संकोच न बाळगता पत्नीेने शाळेत जाण्यापासून ते परीक्षा देण्यापर्यंत खूप कष्ट घेतले होते. तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं", असे हजराबी यांचे पती अहमद यांनी सांगितले. दहावीची परीक्षा पास झाल्या नात सादिया मैनाज म्हणाली की, "आम्ही दोघींनी मिळून अभ्यास केला. तिला काही कळलं नाही, तर मी सांगायचे. आम्ही दोघींनीही दहावीची परीक्षा पास केल्यामुळे घरातील सगळ्यांच आनंद झाला आहे."
    First published:

    Tags: 10th class, Aurangabad News, Board Exam, Education, Maharashtra News, Ssc board, Success story

    पुढील बातम्या