औरंगाबाद, 25 फेब्रुवारी: औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या जटवाडा परिसरात एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याची (Gold businessman looted) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दबा टाकून बसलेल्या आणि दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दिवसाढवळ्या सराफाला लुटलं आहे. यावेळी आरोपींनी सराफाकडील सोन्याचे दागिने असलेली बॅग पळवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खुलताबादपर्यंत भामट्यांचा शोध घेतला आहे. दिवसभर शोध घेऊनही एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. या घटनेचा तपास केला जात आहे. शैलेश एकनाथ टाक असं फिर्यादी सराफा व्यावसायिकाचं नाव आहे. ते हार्सूल परिसरातील सारा वैभव येथील रहिवासी असून त्याचं काटशेवरी फाटा परिसरात कार्तिकी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. ते दररोज आपल्या दुचाकीने दुकानात ये-जा करतात. तसेच दुकानात चोरी होईल म्हणून दुकानातील सोनंही ते सोबतच बाळगतात. घटनेच्या दिवशी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी देखील ते दुकान बंद करून आपल्या घरी चालले होते. यावेळी देखील त्यांनी दुकानातील सोनं बॅगमध्ये घेऊन दुचाकीने घराकडे जात होते. हेही वाचा- जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच केला खेळ खल्लास, लव्ह स्टोरीचा भयावह शेवट यावेळी दोन तरुणांनी युनिकॉर्न गाडीने फिर्यादीचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी शैलेश यांच्या गाडीला लाथ मारून त्यांना खाली पाडलं. याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या दोन जणांनी दुचाकीवरील दोघांनी असं चौघांनी सराफाला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी रस्त्यावर काही तरुणांमध्ये वाद सुरू असावा, असं आसपासच्या लोकांना वाटलं. तसेच काहींनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षदर्शींना काही कळायच्या आत आरोपींनी सोनं ठेवलेली बॅग पळवून नेली. हेही वाचा- जीवलग मित्राच्या निधनानं व्याकूळ झाला तरुण; अखेर 8 दिवसानंतर केला धक्कादायक शेवट या बॅगेत चार तोळे सोनं असल्याची माहिती फिर्यादी सराफा व्यावसायिकानं पोलिसांना दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी चार अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दिवसभर पोलिसांनी खुलताबाद परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. पण पोलिसांना काहीही माहिती मिळाली नाही. औरंगाबादेतील जटवाडा परिसरात भरदुपारी चोरीची ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.