मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाप्पा पावला! औरंगाबादच्या गिरीश पटेल यांना लागली 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी

बाप्पा पावला! औरंगाबादच्या गिरीश पटेल यांना लागली 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी

औरंगाबाद शहरातील व्यावसायिक गिरीश पटेल यांना 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.

औरंगाबाद शहरातील व्यावसायिक गिरीश पटेल यांना 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.

औरंगाबाद शहरातील व्यावसायिक गिरीश पटेल यांना 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.

औरंगाबाद, 14 सप्टेंबर : देव जेव्हा देतो तेव्हा तो भरभरून देतो. याचीचं प्रचिती औरंगाबाद शहरातील व्यावसायिक गिरीश पटेल यांना आली आहे. गणेशोत्सव सणानिमित्त 2 कोटी 50 लाख रुपयांची लॉटरी व्यावसायिक गिरीश पटेल यांना लागली आहे. व्यावसायिक गिरीश पटेल यांना दुसऱ्यांदा ही लॉटरी लागली आहे. यापूर्वी त्यांना 3 कोटी 56 लाख रुपयांची देखील लॉटरी लागली होती. गिरीश पटेल हे औरंगाबाद शहरामध्ये राहतात. त्यांचे सिव्हिल इंजिनीअरिंगरचे शिक्षण झालेले असून ते कॉन्ट्रॅक्टरशिप व प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय करतात. सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण झालेले गिरीश हे पत्नी, दोन मुले, आई, भाऊ-बहिणीसोबत एकत्रित कुटुंबात राहतात. 9 वर्षांपासून ते लॉटरीची तिकिटे घेतात. यंदा गणेशोत्सव सणानिमित्त पंजाब राज्याच्या मंथली डीअर लॉटरीचे पहिले  2 कोटी 50 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जिंकले आहे. नुकतेच 10 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने या लॉटरीचा निकाल काढण्यात आला होता. हेही वाचा :  धक्कादायक! तब्बल 10 वर्षांपासून जलकुंभाची साफसफाईच नाही; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO लॉटरी विजेता व्यावसायिक गिरीश पटेल म्हणाले की "खेलेंगे नही तो, जितेंगे कैसे?  यामुळे डीअर लॉटरीची तिकिटे खरेदी करतो. यापूर्वी देखील 3 कोटी 56  लाखांचे बक्षीस लागले होते. तेव्हापासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत असतो. मला लागलेल्या या लॉटरीचा पैसा मी माझ्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी खर्च करणार आहे". व्यावसायिक गिरीश पटेल यांनी शहरातील सिद्धिविनायक लॉटरी सेंटर येथून खरेदी केलेल्या तिकिटाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. याबद्दल मुंबई येथील 'फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस कंपनी'चे सेल्स हेड राजेश मदान व आनंद मवानी यांनी भाग्यवंत विजेते गिरीश पटेल आणि ज्यांच्या लॉटरी सेंटरवरून तिकीट विक्री झाले त्या अजय जैस्वाल यांचाही सत्कार केला. दरम्यान, व्यावसायिक गिरीश पटेल यांना यापूर्वी देखील 3 कोटी 56  लाखांचे बक्षीस लागले होते. 18 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना 'थंडरबॉल' लॉटरीचे 3 कोटी 56 लाखांचे बक्षीस लागले होते. त्यानंतर गिरीश यांना दुसऱ्यांदा लॉटरीचे पहिले बक्षीस 2 कोटी 50 लाख लागले आहे.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या