जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माजी विद्यार्थ्याचा शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

माजी विद्यार्थ्याचा शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

माजी विद्यार्थ्याचा शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

तक्रारदार शिक्षिका शहरातील नामवंत शाळेत कार्यरत आहेत.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 10 ऑक्टोबर : औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका माजी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षिकेला हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शिक्षिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे सांगून एका 55 वर्षीय शिक्षिकेला माजी विद्यार्थ्याने गंडवले आहे. आरोपी विद्यार्थ्याने तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे. तक्रारदार शिक्षिका शहरातील नामवंत शाळेत कार्यरत आहेत. शिक्षिकेने त्याला अॅपलचा मोबाइल व लॅपटॉपविषयी विचारणा करून ऑर्डर दिली. त्यासाठी त्याने 40 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही, असे म्हणून 50 हजार मागितले. डिस्काउंट जरा कमी झाला म्हणून 11 हजार अजून पाठवा, अशी विविध कारणे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. हेही वाचा -  या बँका देताएत एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज, एका सरकारी बँकेचाही समावेश मात्र, मोबाइल, लॅपटॉपविषयी तो काहीही बोलत नसल्याने शिक्षिकेला संशय आला. काही दिवसांनी तो मोबाइल बंद करून फरार झाला. यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे शिक्षिकेच्या लक्षात आले. यानंतर शिक्षिकेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात