औरंगाबाद, 11 जून : उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसेल, तर तुम्ही विदेशी भाषा (Foreign Language) शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता. यासाठी तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागामध्ये बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता. चायनीज, फ्रेंच, जर्मन या भाषा शिकता येऊ शकतात. तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. (Foreign Language Courses in BAMU) मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकून त्यामध्ये आपलं करिअर करण्याची इच्छा असते. मात्र, या भाषा शिकायला कुठे मिळतात आणि या साठी किती खर्च लागतो, हे काहीच माहीत नसते. यामुळे अनेकदा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मात्र, विदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी मिळावी, यासाठी विदेशी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक विदेशी भाषा शिकवल्या जात आहेत. विभागात फ्रेंच जर्मन आणि चायनीज या तीन भाषा शिकवल्या जातात. वाचा :
Career After 12th: विद्यार्थ्यांनो, कॉमर्स म्हणजे फक्त CA नाही; ‘हे’ भन्नाट कोर्सेस देतील मोठ्या पगाराचे जॉब्स
विदेशी भाषेचे प्रमुख विकास कुमार सांगतात की, “मराठवाड्यात पारंपारिक शिक्षणाची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा नोकऱ्यांच्या संधी मिळत नाही. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात, त्यांना चांगला पगार मिळत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी इच्छा नसतानाही कमी पगारामध्ये नोकरी करतात. मात्र, विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकून चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी विदेशी भाषा शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या संधी मिळाव्यात.”
गुगल मॅपवरून साभार…
या विभागात कोणत्या विदेशी भाषा शिकू शकता? सर्टिफिकेट अप्रोपॅसिंग इन चायनीज, फ्रेंच ॲन्ड जर्मन, डिप्लोमा, पीजी डिप्लोमा इन चायनीज ॲन्ड जर्मन, असे कोर्स करून तुम्ही विदेशी भाषा शिकू शकता. या कोर्सेसचा कालावधी विचार केल्यास CoP आणि डिप्लोमाचं एक सत्र आणि पीजी डिप्लोमा 2 सेमीस्टरचा आहे. या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया bamu.ac.in समजून घेऊ शकता. संपर्कासाठी head.foreignlanguage@bamu.ac.in आहे. या कोर्सेसची फी 5000 ते 10000 इतकी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये विदेशी भाषा विभाग, हा पत्ता आहे. बारावी मार्कशीट, जात प्रमाणपत्र, फोटो लागतात. विद्यार्थ्यांची मर्यादा 40 आहे. अमेझॉन, एचसीएल, वर्लोप , इन्फोसिस, टीसीएस इत्यादी कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. साधारण 5 लाखांचे पॅकेज मिळू शकतं.