Home /News /maharashtra /

Aurangabad : आवक कमी झाल्यामुळे फुलांचे दर झाले अव्वाच्या सव्वा; ऐन लग्नाच्या सीझनमध्ये महागाईमुळे ग्राहकांना फुटलाय घाम : VIDEO

Aurangabad : आवक कमी झाल्यामुळे फुलांचे दर झाले अव्वाच्या सव्वा; ऐन लग्नाच्या सीझनमध्ये महागाईमुळे ग्राहकांना फुटलाय घाम : VIDEO

title=

औरंगाबाद शहरात बाजारात फुलांचे दर (Flower Rates) वाढलेले आहेत. ऐन लग्नाच्या सीझनमध्ये फुलांच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. उन्हाच्या कडाक्यामुळे फुलबागांना हवे तितके पाणी मिळत नाही. फुलांची आवक कमी झालीय आणि मागणी वाढली आहे.

पुढे वाचा ...
    औरंगाबाद, 4 जून : लग्नसराईचा सीझन (Wedding Season) सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लग्न समारंभामध्ये सजावटीसाठी फुलांची मागणी असते. मात्र, उन्हाची तीव्रता खूप असल्याने फुलांची आवक घटली आहे. अशातच मागणी वाढल्याने फुलांच्या किमती वाढल्या (Flower Rates) आहेत. त्यामुळे वधुवरांच्या नातेवाईकांच्या खिशाला फुलांच्या वाढत्या दरामुळे कात्री लागत आहे. (Flower prices rise in Aurangabad market) बाजारामध्ये 50 ते 100 रुपये प्रति किलो मिळणारे निशिगंधाचे फूल, आता 350 ते 400 रुपये प्रति किलो मिळत आहे. लग्नाच्या सिझनमध्ये मोगऱ्याच्या फुलांनादेखील मोठी मागणी असते, यामुळेच या मोगऱ्याच्या फुलांना आता 500 ते 600 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. यामुळेच मोगर्‍याच्या फुलाचा गजरा 15 ते 20 रुपये प्रमाणे विकला जात आहे. निशिगंधा, गुलाब, मोगऱ्याच्या फुलाची वाढली मागणी लग्नामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला वधू-वराचा स्टेट सजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट केली जाते. स्टेट सजवण्यासाठी लागणारे निशिगंधा, जरबेरा, झेंडू, मोगरा, गुलाब इत्यादी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचं फुल विक्रेते समाधान विखे-पाटील यांनी सांगितले. वाचा : महागाई कंबरडं मोडणार; आता कपडे खरेदी करणेही महाग होणार, काय आहे कारण? लग्न समारंभ कार्यक्रम तसेच आणि ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी बुक्यांची वापर होतो. मात्र, यामुळे त्यांच्या किमतीदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही दिवसांपूर्वी 2 रुपयांना मिळणार गुलाबाचं फूल आता 5 रुपयाला मिळत आहे. यामुळे गुलाबाच्या किमतीदेखील वाढलेल्या आहेत. तसेच जरबेराचे फुलदेखील महागले असून आता एका फुलाची किंमत 10 रुपये झाली आहे. फुले ताजी सोडण्यासाठी पाण्याचा वापर.... गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेले असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. याचा मोठा परिणाम फुल बागांवर झाला आहे. पाण्याची कमतरता असल्याने फुलांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यासोबतच काढलेले फुल ताजी ठेवण्यासाठी विक्रेत्यांनादेखील त्यावर सतत पाण्याचा फवारा करावा लागतो. यामुळे देखील फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. वाचा : LPG Price: महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त; आता काय आहे नवीन किंमत? यासंदर्भात बोलताना फुल विक्रेते समाधान पाटील विखे म्हणाले की, "लग्नचा सीझन सुरू आहे. यामुळे बाजारामध्ये फुलांची मागणी वाढली आहे. मात्र कडक उन्हाळा सुरू आहे. पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे फुलबागांना देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. यामुळे फुलांची आवक घटली आहे आणि यामुळे फुलांची किमतीमध्ये वाढ झाली." फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या प्रतिमा जाधव म्हणाल्या की, "देशामध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. घरामध्ये लग्न आहे. त्याासाठी फुलांची खरेदी करण्यासाठी फुलांच्या मार्केटमध्ये आलो तर, फुलांचे दर अव्वाच्या सव्वा झालेले आहेत. पण, घरात लग्न आहे म्हणून थोडी झळ सोसून फुलं खरेदी करावीच लागत आहेत"
    First published:

    पुढील बातम्या