मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : बेटी झाली दुसऱ्यांच्या 'धनाची पेटी', वडिलांमुळे औरंगाबादच्या 30 मुलींच्या घरी 'समृद्धी'

Video : बेटी झाली दुसऱ्यांच्या 'धनाची पेटी', वडिलांमुळे औरंगाबादच्या 30 मुलींच्या घरी 'समृद्धी'

X
Aurangabad

Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला आणि गावातील 30 घरांंमध्ये समृद्धी आली आहे.

Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला आणि गावातील 30 घरांंमध्ये समृद्धी आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 23 जानेवारी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण सर्वांनी बरीच प्रगती केलीय. समाज पुढारला आहे, असं नेहमी सांगितलं जातं. त्यानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा आग्रह करणारे बरेच जण आहेत. या आग्रहाच्या अतिरेकातून स्त्री भ्रूण हत्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील झोंड कुटुंबीयांनी घरात मुलीचं जल्लोषात स्वागत केलंय. त्यांनी आपला आनंद साजरा करताना सामाजिक भानही जपलंय. गावातील 30 मुलीचं टपाल कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेत खातं त्यांनी उघडून दिलं आहे.

कशी सुचली कल्पना?

प्रवीण झोड हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील गोळेगावचे आहेत. टपाल कार्यालयात कामाला असलेले प्रवीण औरंगाबाद शहरातील टी पॉईंट परिसरातील म्हसोबा नगरमध्ये राहतात. त्यांच्या पत्नी विद्या या शिक्षिका आहेत. त्यांना पहिला मुलगा आहे. त्यानंतर कन्यारत्न प्राप्त झाले.

'आजही समाज मुलगी झाल्यावर नकारात्मक विचार करतो किंवा वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट करतो. या  प्रकारच्या बातम्या मी वाचल्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटनांमुळे माणुसकीवरचा विश्वास संपत चाललाय का? असा प्रश्न पडला होता. ही नकारत्मकता संपवण्याचा आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे.'

Video : 1 वेळा जेवण आणि 14 तास अभ्यास, चप्पल शिवणाऱ्याची मुलगी झाली CA

दवंडीमधून दिली माहिती

झोंड कुटुंबीयांनी चक्क गावात दवंडी करत मुलींची नावं शोधली आहेत. 'ग्रामीण भागामध्ये सरकारी योजनांबाबत पुरेशी जागृती नसते. अनेकांना पोस्टाची सुकन्या समृद्धी योजनेची माहिती नाही. हे गोष्ट लक्षात ठेवून आम्ही गावातील पदाधिकारी आणि यंत्रणांच्या माध्यमातून दवंडी देऊन मुलींची माहिती मागितली. त्यानंतर आमच्याकडे 30 मुलींची कागदपत्र जमा झाली. आम्ही या मुलींची सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत खाती उघडून दिली आहेत.

मुलगा एकाच घरासाठी प्रकाश देतो, मुलींमुळे दोन घरं उजळतात. त्यामुळे आम्ही मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं. त्याचबरोबर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा गावातील 30 मुलींची खाती उघडली आहेत,' असं प्रवीण यांनी स्पष्ट केलं.

'मला मुलगी झाली याचा मला खूप आनंद झाला. आम्ही जिजा असं मुलीचं नाव ठेवलं आहे. आम्ही तिला शिकवून मोठं करणार असून समाजामध्ये मुलींबाबत असलेली नकारत्मकता कमी करण्यासाठी यापुढेही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत,' असं मुलीच्या आई विद्या झोंड यांनी सांगितलं.

First published:

Tags: Aurangabad, Daughter, Local18