Home /News /maharashtra /

Sambhaji Nagar : तुम्हाला माहिती आहे का संभाजीनगरचं नाव फतेहपूर होतं?

Sambhaji Nagar : तुम्हाला माहिती आहे का संभाजीनगरचं नाव फतेहपूर होतं?

या शहरांची नावं कशामुळे बदलण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागणार आहे.

या शहरांची नावं कशामुळे बदलण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागणार आहे.

या शहरांची नावं कशामुळे बदलण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागणार आहे.

    मुंबई, ३० जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (29 जून 22) रात्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Uddhav Thackeray Resigns) दिला. त्यापूर्वी संध्याकाळी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये औरंगाबाद (Aurangabad city renamed) आणि उस्मानाबाद (Osmanabad city renamed) या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानुसार, आता औरंगाबादला संभाजीनगर (Sambhaji Nagar) म्हणून ओळखलं जाणार आहे, तर उस्मानाबादला धाराशिव (Dharashiv) असं नाव देण्यात आलं आहे. या शहरांची नावं कशामुळे बदलण्यात आली, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागणार आहे. औरंगाबाद नाव कसं पडलं? अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा सिद्दी सेनापती मलिक अंबर याने 1610 साली औरंगाबादची स्थापना केली होती. त्यावेळी या शहराचे नाव खिरकी किंवा खडकी असं होतं. मलिक अंबरचा मुलगा फतेह खान यानं, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शहराला स्वतःचं नाव दिलं. त्यामुळे 1626 पासून हे शहर फतेहपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर 1653 साली मुघल सम्राट औरंगजेबाने दख्खनवर हल्ला केला आणि या शहरात आपली राजधानी (How Aurangabad got its name) उभारली. तेव्हा या शहराचं नाव औरंगाबाद ठेवण्यात आलं. तेव्हापासून या शहराला हेच नाव आहे. 1689 साली औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) क्रूर हत्या करण्यात आली होती. नामांतराची मागणी बाळासाहेबांचीच 1980 च्या दशकात शिवसेना मुंबई-ठाण्याबाहेर पडण्याचा विचार करत होती. यासाठी औरंगाबाद हा एक चांगला पर्याय होता. या ठिकाणी 30 टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. त्यामुळे हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या शिवसेनेने (Shivsena) इथं पाय रोवण्यास सुरुवात केली. पुढे 1988 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीमुळे (1988 communal violence) शिवसेनेचं पारडं जड झालं, आणि औरंगाबाद महानगरपालिका (AMC) सेनेच्या ताब्यात आली. या दंगलीमध्ये 25 जणांचा बळी गेला. 8 मे 1988 रोजी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, म्हणजेच संभाजीनगर असं नाव देण्याची घोषणा (Balasaheb Thackeray Announced renaming of Aurangabad) केली. 1995 साली औरंगाबाद पालिकेने याबाबतचा प्रस्तावही पारित केला. त्यावेळी राज्यातही शिवसेनेची सत्ता होती. राज्य सरकारने यासंबंधी लोकांच्या सूचना आणि हरकती मागवण्याची अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेला काँग्रेसचे औरंगाबादमधील तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी न्यायालयात आव्हान दिले. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. यानंतर शहराचं नाव बदलण्याचा निर्णय रखडला. तेथून पुढे वेळोवेळी हा मुद्दा समोर आणला गेला, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही, असं वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे प्रसिद्ध केलं आहे. अचानक का घेतला निर्णय? अडीच वर्षांपूर्वी तयार झालेल्या महाविकास आघाडीमुळे (MVA government) राज्यात शिवसेना नव्या पक्षांसोबत सत्तेत आली. तेव्हापासून भाजप (BJP) आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या दोन्ही पक्षांनी औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी सरकारकडे केली होती. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा निर्णयदेखील हे सरकार पूर्ण करू शकत नाही, अशी टीका महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली जात होती. भाजप, आणि गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदारदेखील शिवसेनेवर टीका करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांच्या दबावाखाली शिवसेना आपले हिंदुत्व सोडत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मार्च 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद विमानतळाचे (Renaming Aurangabad Airport) नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव पारित केला. मात्र, याला अद्याप केंद्राची मान्यता मिळाली नाहीये. शिवसेनेने वेळोवेळी भाषणांमधून वा आपले मुखपत्र सामना वृत्तपत्रामधून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. मात्र, त्याबद्दल अधिकृत निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर, या सरकारच्या शेवटच्या दिवशी झालेल्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. यासोबतच हैदराबादचा शेवटचा शासक मीर उस्मान अली खान याच्या नावावरुन ठेवण्यात आलेले ‘उस्मानाबाद’ हे नावदेखील बदलण्यात आलं आहे. उस्मानाबादला आता धाराशिव म्हणून ओळखले जाईल. शिवसेनेचा निर्णय त्यांनी हिंदूत्व सोडल्याच्या होत असलेल्या टीकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे असंही बोललं जातंय.
    First published:

    पुढील बातम्या