औरंगाबाद, 17 जून : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर रणनीती यावर आधारित परवली (Parvali Drama in BAMU) नाटकात प्रचंड थ्रिलर आणि सस्पेन्स आल्याने परवली नाटकातून प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनुभव नाटकाच्या माध्यमातून अनुभवला. यामुळे नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या (BAMU students) वतीने नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित लेख लेखन केलेल्या नाटकांचे सादरीकरण करण्यात येत आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा हा प्रात्यक्षिकाचा भाग आहे. दरवर्षी हा नाट्यमहोत्सव भरवला जातो. मात्र, कोरूना महामार्गामुळे दोन वर्ष नाट्य महोत्सव भरविण्यात आला नाही. यावर्षी मात्र नाट्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'परवली' नाटकाची कथा काय आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकेच स्वराज्याला सुरुवात केली होती. स्वराज्याला सुरुवात झाली होती. स्वराज्य स्थापन होताना शिवाजी महाराजांना सहकार यांनी साथ दिली होती. यामध्ये त्यांना एक आणखी एक सहकारी मिळाला. ज्यांचं नाव बहिर्जी नाईक जे गुप्तहेर प्रमुख होते. आणि याच बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित हे नाटक आहे. त्या काळामध्ये गुप्तहेर नीती कशी होती, या गुप्तहेर आणि त्यातील बारकावे कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.
वाचा : MH BOARD SSC RESULT: अपयश आलं म्हणून खचू नका; अजून एक संधी; पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
त्या काळामध्ये प्रत्येकाचे साम्राज्य होते. या साम्राज्यामध्ये एकमेकांबद्दल युद्ध होते. यामुळे विरुद्ध पक्षातील साम्राज्यात जाऊन तेथील बारकावे माहिती करून घेणे हे गुप्तहेरांचे प्रमुख काम असायचं. आणि हे काम बहिर्जी नाईक खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत होते. गुप्तहेर कसे तयार करायचे त्यांना कसे प्रशिक्षण द्यायचे हे काम बहिर्जी नाईक करत होते. यावेळ परवली वापरली जात असे. परवली म्हणजे आत्ताचा इंग्रजी शब्द आपण वापरतो तो म्हणजे पासवर्ड.
वाचा : MH BOARD SSC RESULT: ‘धक-धक करने लगा’; Result ला अवघे काही काही मिनिटं शिल्लक; इथे बघा थेट निकाल
या पासवर्डच्या माध्यमातून गुप्तहेर माहिती पुरवत असे. या गुप्तहेरांच्या साखळी च्या माध्यमातून संपूर्ण माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोचवली जात होती. नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ. स्मिता साबळे म्हणाल्या की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षी नाट्यमहोत्सव घेतला जातो. नाट्य महोत्सवात विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित व लेखन केलेल्या नाटकांचे सादरीकरण केले जाते. विद्यार्थ्यांचा हा प्रात्यक्षिकाचा भाग असतो. यातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळतं."
नाटकाबद्दल कलाकारांना काय वाटतं?
"या नाटकात मी नायकाच्या विश्वासू हिरोची भूमिका साकारत आहे. नाटकात प्रचंड थ्रिलर आणि सस्पेन्स आहे. नाटकात वेगवेगळे पैलू उलगडत जातात आणि या पैलूंना चांगल्या पद्धतीने उलगडण्यासाठी माझं कसब पणाला लागली आहे. आणि ही भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे", लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार ऋषिकेश गोल्हारे यांनी सांगितले. तर नाटकातील स्त्रिची भूमिका साकरलेल्या पृथ्वी काळे म्हणाली की, "नाटकामध्ये एका स्त्रीची भूमिका मी साकारत आहे. जी पूर्वी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पक्षात होती मात्र शिवाजी महाराजांचे काम बघून ती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करू लागली. गेल्या दोन महिन्यांपासून या नाटकाचा सराव करत आहोत. नाटकाचा सराव करताना शिवाजी महाराजांचा काळ आम्ही अनुभवत आहे, यामुळे खूप छान वाटतंय."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.