औरंगाबाद, 8 जून : उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer Vacation) म्हटलं की, आठवतं ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करण्याचे दिवस. मात्र, आता मुलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही (Children’s mobile habit) यामध्ये गुंतले आहेत. कोरोना काळामुळे त्यात आणखी भर पडली. या आभासी जगातून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘क्रिएटीव्ह समर कॅम्प’च्या (Summer Camp) वतीने मुलांसाठी धम्माल, मजा, मस्ती करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घोडेस्वारी, पोहणे, स्केटिंग, फुटबॉल, क्ले मेकिंग, डान्स यांसारख्या एक्टिव्हिटीजमध्ये मुलांना खेळायला आणि शिकायला मिळाले. 24 वर्षांपासून उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शालेय विद्यार्थ्यासाठी 10 दिवसीय क्रिएटिव्ह समर कॅम्पचे आयोजन प्रोझोन मॉलमध्ये सुरु आहे. हे शिबिर १९९७ पासून २४ वर्षांपासून उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. शिबिराची सकाळी 10 ते 4 ही वेळ आहे. ४ ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात भाग घेऊ शकतात. शिबिरात विद्यार्थ्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे .मुलांचे बौद्धिक शारीरिक वाढ व्हावी, यासाठी पालक वर्ग या शिबिराला पसंती देत आहे. वाचा : कुणाला आर्थिक लाभ तर कुणाला आर्थिक हानी; तुमच्या राशीत काय पाहा तुमचं राशिभविष्य शिबिराचे आयोजक रवी जयस्वाल म्हणाले की, “शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे शिबिर आयोजन करणार हा पहिलाच ग्रुप आहे. टॅटू काढणे, घोडेस्वारी करण्याचा अप्रतिम अनुभव मुलांना मिळतो. .या शिबिरामध्ये 15 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळ शिकवले जातात. ज्यामध्ये बौद्धिक शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा हा उद्देश आहे.” वाचा : World Ocean Day 2022: महासागरांशिवाय मानवी जीवन अशक्य! ते नसतील काय होईल वाचा “इतकंच नाही तर पोहणे, स्केटिंग, पोहणे, घोडेस्वारी, नृत्य, इनडोअर क्रिकेट, ड्रॉइंग, टॅटू तयार करणे, ग्रीटिंग कार्ड बनवणे क्ले मेकिंग आणि बरेच काही खेळ या शिबिरात आहेत. घोडेस्वारीचा चांगला अनुभव आम्हाला मिळत असल्याचं सहभागी विद्यार्थी सांगतात”, असे आयोजकांना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







