Home /News /maharashtra /

शेवटच्या घटका मोजतायेत औरंगाबादेतील 'सायफॉन मनोरे', काय आहे या मनोऱ्यांच्या इतिहास? VIDEO

शेवटच्या घटका मोजतायेत औरंगाबादेतील 'सायफॉन मनोरे', काय आहे या मनोऱ्यांच्या इतिहास? VIDEO

औरंगाबाद:

औरंगाबाद: मलिक अंबर (Malik Ambar)यांच्या काळामध्ये औरंगाबाद शहराच्या पाण्याचा प्

औरंगाबाद शहराला ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहे. त्यामध्ये सायफाॅन मनोऱ्यांचाही (Siphon Towers) समावेश होतो. पण, आता त्या मनोऱ्यांची दुरावस्था झाली आहे. या मनोऱ्यांचा वापर हा प्रेशरने जमिनीतील पाण्याच्या पाईपलाईन्स फुटू नयेत, यासाठी केला जात असे.

पुढे वाचा ...
  औरंगाबाद, 7 जून : मलिक अंबर (Malik Amber) यांच्या काळामध्ये औरंगाबाद शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यासाठी नहरी तयार करण्यात आल्या होत्या. या नहरीच्या माध्यमातून शहरांमध्ये पाणीपुरवठा केला जात होता. जमिनीतून करण्यात आलेल्या पाईपलाईन्स पाण्याच्या प्रेशरने फुटू नये, यासाठी शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 'सायफॉन मनोरे' (Siphon Towers) तयार करण्यात आले होते. हे मनोरे पाण्याचा वेग कमी करण्याचं काम करत होते. मात्र, आता शहरातील पाण्याच्या नहरी जवळपास बंद झाल्या आहेत. आता उरले आहेत फक्त या नहरीचे अवशेष. या ऐतिहासिक मनोऱ्यांपैकी एक उस्मानापुरा भागात सायफोन मनोरा आहे, त्याचा आता प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे दुरावस्था झाली आहे. वाचा : Aurngabad : औरंगाबादचे ‘ताजमहाल’ पाण्याविना कोरडेठाक, पर्यटक संतापले, VIDEO शहराच्या दर्गा परिसरामध्ये असलेला हा मनोरा आता शेवटच्या घटका मोजत आहे. या मनोऱ्यासंदर्भात बोलताना इतिहासकार रफत कुरेशी सांगतात की, "औरंगाबाद शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, यामुळे जगाच्या नकाशामध्ये औरंगाबाद शहराची एक वेगळी ओळख आहे. बीबी का मकबरा, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी या सोबतच सुंदर दरवाजे शहरांमध्ये आहेत. मात्र, शहरातील इतिहासकालीन वस्तुंचे संवर्धन संबंधित प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे या वस्तू नष्ट होण्याचा कगारवर आहेत. जर औरंगाबादची ओळख टिकवून ठेवायची असेल तर इथल्या ऐतिहासिक वास्तू जतन करायला हव्यात." कुठे आहे हा ऐतिहासिक मनोरा आणि काय आहे या मनोऱ्यांच्या इतिहास? औरंगाबात शहराच्या शहानुर मिया दर्गा, उस्मानापुरा पोलीस स्टेशन या परिसरात हा सायफाॅन मनोरा आहे. असे मनोर शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी मलिक अंबरच्या काळात तयार करण्यात आले होते. जमिनीखाली असणाऱ्या पाईपलाईन्स प्रेशरने फुटू नयेत, यासाठी हे मनोरे उभे करण्यात आले होते. मात्र, काळानुरुप हे मनोरे आता जिर्ण होत आहेत. हा एक ऐतिहासिक वारसा शहराला लाभलेला आहे. परंतु, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मनोऱ्यांचा अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. इतकंच नाही, तर काही मनोरे हे तोडून टाकण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. ज्यांच्या व्यक्तीच्या घरासमोर किंवा दुकानांसमोर हे मनोरे आडवे येतात, ते कोणाचीही परवानगी न घेता तोडून टाकत आहेत.
  गुगल मॅपवरून साभार...
  ऐतिहासिक सायफाॅन मनोऱ्यापर्यंत कसे पोहोचाल? 'नहरे अंबर'चा हा सायफोन मनोरा औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर, रेल्वे स्टेशनपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी जाण्यासाठी शहरातून खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. यासोबतच खाजगी वाहनांचादेखील वापर करता येऊ शकतो. हे ठिकाणी पाहण्यासाठी कोणतेही तिकीट आकारले जात नाही. अनेक इतिहास संशोधक या मनोऱ्यांचा अभ्यास करण्यास ठिकाणी येत असतात.
  First published:

  Tags: Aurangabad News

  पुढील बातम्या