जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तो बिबट्याचा हल्ला नाही, बायकोला शिट्या मारतो म्हणून.. औरंगाबाद प्रकरणाला वेगळं वळण

तो बिबट्याचा हल्ला नाही, बायकोला शिट्या मारतो म्हणून.. औरंगाबाद प्रकरणाला वेगळं वळण

तो बिबट्याचा हल्ला नाही, बायकोला शिट्या मारतो म्हणून.. औरंगाबाद प्रकरणाला वेगळं वळण

तरुणावर बिबट्याचा हल्ला नसून त्याच खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, औरंगाबाद औरंगाबाद, 3 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रात्री आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, मृतदेह शवविच्छेदनाचा अहवाल काही वेगळच सांगत होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. संबंधित तरुणाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसून त्याचा खून झाल्याचे समोर आले. काय आहे प्रकरण? रवींद्र काजळे, असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र काजळे आणि त्यांच्या मोठ्या भावाने शेतात पार्टी करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता ते पार्टी करण्यासाठी घरातून शेताकडे जाण्यासाठी निघाले. यात रवींद्र काजळे अगोदर शेताकडे गेला होता. त्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ आणि मित्र देखील शेतात गेले. दरम्यान, त्यांना गावाजवळील शेतात रवींद्र याचा मृतदेह आढळून आला. रवींद्र याची मान पूर्णपणे तोडलेली होती. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असल्याची अफवा गावभर पसरली होती. मात्र तो बिबट्याचा हल्ला नसून बायकोला शिट्या मारतो म्हणून त्या तरुणाचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी गणेश कैलास चव्हाण याला पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केलं. रवींद्र बायकोला शिट्या मारतो म्हणून त्याचा खुन केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी सिल्लोड पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचा - धक्कादायक : पतीनं फोन तोडल्याच्या रागातून पत्नीने केली आत्महत्या! नववर्षात एकाच दिवशी आढळले 3 मृतदेह नववर्षात औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 3 मृतदेह आढळले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील न्यू हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. कदम यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना दुर्गंधी पसरल्याने याचा उलगडा झाला. शेतकऱ्याने पोलिसांना माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह दहा ते बारा दिवसांअगोदर आणून टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तर दुसरा एक व्यक्तीचा मृतदेह हा गंगापूर तालुक्यातील पेंढापूर फाट्याजवळ एका शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे. या मृतदेहाची देखील ओळख अजून पटलेली नाही. विशेष म्हणजे, हे दोन्हीही मृतदेह उसाच्या शेतात मिळून आले. तर तिसरा मृतदेह औरंगाबादेतील उद्योग नगरी ओळख असलेल्या वाळूज परिसरातील गरवारे कंपनीच्या गोडाऊन जवळ आढळून आला आहे. हा 32 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात