Home /News /maharashtra /

Aurangabad Special Report : भीमनगरात घरात घुसतंय ड्रेनेजचं पाणी; लेकरं पडली आजारी, तरीही प्रशासन ढिम्म!

Aurangabad Special Report : भीमनगरात घरात घुसतंय ड्रेनेजचं पाणी; लेकरं पडली आजारी, तरीही प्रशासन ढिम्म!

भीमनगर,

भीमनगर, औरंगाबद.

स्मार्ट सिटी असणाऱ्या औरंगाबाद शहरातील भीमनगर भावसिंगपुरा येथे मागील अनेक वर्षांपासून ड्रेनेजची लाईन फुटते आणि त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी वस्तीभर पसरते. त्याचा परिमाणी स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

    औरंगाबाद, 18 जून : "आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भीमनगर भावसिंगपुरा (Smart City Aurangabad) येथे राहतो. आमच्या घरासमोरून परिसरातील संपूर्ण ड्रेनेजची लाईन दारातून जाते. मात्र, ही ड्रेनेज लाईन दर 15 दिवसांनी फुटते. ड्रेनेज लाईन दारात असल्याने ड्रेनेजचे पाणी दारापुढे येतं, या पाण्यामुळे घरातून बाहेरदेखील निघणे शक्य होत नाही. नेहमीच माझ्या घरासमोर ड्रेनेजचे पाणी असल्याने नातेवाईक आम्हाला नावं ठेवतात. एवढेच काय तर 8 दिवसांपूर्वी माझ्या मुलीला पाहुणे बघायला येणार होते. पण, ड्रेनेजचे पाणी दारात तुंबलेलं असल्याने लोक नावं ठेवतील या भीतीपोटी मी त्यांना नकार दिला", ही कैफियत बबिता अहिरे यांनी मांडली. (Drainage water problem in Bhimnagar) औरंगाबाद महानगरपालिकेपासून काही अंतरावर भीमनगर भवसिंगपुरा ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये हजारो नागरिक राहतात. भीमनगर भावसिंगपुरामध्ये ड्रेनेज नेहमीच फुटते आणि परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे वसाहतीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी देऊनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. वाचा : Aurangabad Special Report : पाण्यावाचून प्रवाशांचे हाल! औरंगाबादच्या ST Stand वर पाण्याच्या टाकीजवळ पसरलीय दुर्गंधी "आमच्या घरासमोरच ड्रेनेजलाईन आहे, त्यामुळे दर 15 दिवसांला ड्रेनेजलाईन फुटते आणि हे घाणेरडे पाणी रस्ताभर पसरते. हे पाणी रस्त्यावर आल्यानंतर त्यातून वाटही काढता येत नाही. प्रशासनाने लक्ष देऊन आमची या समस्येपासून सुटका करावी", अशी मागणी सुनिता गुत्तीकर यांनी केली. तर स्थानिक नागरिक बिपीन साळुंखे म्हणतात की, "घरासमोर ड्रेनेजचं पाणी साठल्यामुळे आमची लेकरं घराबाहेर येऊ शकत नाहीत. आम्हाला घरातील भांडी बाहेर घासावी लागतात, पण हे ड्रेनेज पाणी बाहेर आलं की, मोठी पंचाईत होते. या पाण्यामुळे आमची लहान मुलं आजार पडतात. ही समस्या नेहमीचीच झाली, प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे." वाचा : Aurangabad : ‘फ्रिज अन् पाण्याच्या जार’मुळे कुंभार व्यावसायिक कोलमडला, ऐका त्यांच्याच तोंडून ‘ही’ कर्म कहाणी! या वस्तीतील कित्येक नागरिकांच्या घरासमोरून ड्रेनेज लाईन गेली असल्यामुळे दारातच दुर्गंधी पसरते. ड्रेनेज लाईन चोक अप झाल्याने नागरिकांना घरातून निघणारदेखील शक्य होत नाही. त्याचबरोबर पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ती दुचाकींची पाणी उडते, तर पायी जाणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून रस्ता काढावा लागतो. या ड्रेनेज लाईन चोक अप होण्याच्या समस्येला या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. यामुळे प्रशासनाने आमचं कायमचा प्रश्न सोडवावा असे नागरिक सांगताहेत. यासंदर्भात औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
    First published:

    Tags: Health, Maharashtra News, महाराष्ट्र

    पुढील बातम्या