औरंगाबाद, 31 डिसेंबर : देशातील तरुण पिढी निर्व्यसनी आणि निरोगी रहावी ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शहरातील निवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारी तब्बल 4 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहेत. याची सुरुवात शुक्रवारपासून झाली असून ओंकारेश्वर, अमरकंटक परत ओंकारेश्वर ते औरंगाबाद असा नर्मदा परिक्रमाचा प्रवास ते तीन महिन्यांमध्ये पूर्ण करणार आहेत. रोज 100 किलोमीटर सायकल चालवायचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. … म्हणून करणार परिक्रमा आज 66 व्या वर्षी देखील मी निरोगी आहे. या 66 वर्षांमध्ये मला एकही औषध गोळी लागलेली नाही. मी ऑफिसला चार चाकी वाहनानं न जाता पायी जात होतो. त्यामुळे कुठलाही आजार मला झालेला नाही. यामुळे माझा देशही निरोगी असावा अशी माझी इच्छा आहे. यामुळे आता माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती मला देशाचे तरुण निर्व्यसनी आणि देश निरोगी व्हावा यासाठी खर्च करायची आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून मी औरंगाबाद पासून नर्मदा परिक्रमा पर्यंतचा 4 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहे, असं प्रवासाला निघण्यापूर्वी दिनकर बिरारी यांनी सांगितले आहे.
यामध्ये प्रवासादरम्यान व्यसनाधीनता आणि योगासना संदर्भात जनजागृती करणार आहे. माझ्यासोबत सायकल, स्लिपिंग बॅग, दोन कपडे, पाणी बॉटल इत्यादी साहित्य सोबत असणार आहे, असंही दिनकर बिरारी यांनी सांगितलं. प्रवास यशस्वी पूर्ण करून येतील शासकीय सेवेत नोकरी केल्यानंतर 66 व्या वर्षी त्यांनी घरात आराम करावा अशी माझी इच्छा असतानाही त्यांना त्यांच्याप्रमाणेच देश निरोगी आणि निर्व्यसनी राहावा यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे. एवढ्या दूरचा सायकलवर एकट्याने प्रवास करणे माझ्यासाठी ती चिंतेची बाब आहे. मात्र, त्यांनी आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामामुळे ते नक्कीच नर्मदा परिक्रमाचा प्रवास यशस्वी पूर्ण करून येतील यावरती मला विश्वास आहे, असं त्यांच्या पत्नी कमल बुरारे यांनी सांगितलं.

)







