जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad Crime : नशेत तर्रर बाईच्या वेशात घरात खुसला अन् नागरिकांनी चोपला, मॉब लिंचींगचा प्रयत्न झाल्याची चर्चा

Aurangabad Crime : नशेत तर्रर बाईच्या वेशात घरात खुसला अन् नागरिकांनी चोपला, मॉब लिंचींगचा प्रयत्न झाल्याची चर्चा

Aurangabad Crime : नशेत तर्रर बाईच्या वेशात घरात खुसला अन् नागरिकांनी चोपला, मॉब लिंचींगचा प्रयत्न झाल्याची चर्चा

औरंगाबादमध्ये नशेत तर्रर असलेला एक अनोळखी नशेखोर गवारे यांच्या घरात घुसला आणि तेथेच पडला. नंतर स्थानिकांनी चोपला

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद, 06 ऑक्टोंबर : औरंगाबादमध्ये नशेत तर्रर असलेला एक अनोळखी नशेखोर गवारे यांच्या घरात घुसला आणि तेथेच पडला. काही केल्या तो घरातून बाहेर निघत नव्हता आणि उलट सुलट उत्तरे देत होता. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली असता मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोपला. मात्र काही दक्ष नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना बजाजनगर येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेनंतर मॉब लिंचींगचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली होती.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये नशेत तर्रर असलेला एक अनोळखी नशेखोर गवारे यांच्या घरात घुसला आणि तेथेच पडला. काही केल्या तो घरातून बाहेर निघत नव्हता आणि उलट सुलट उत्तरे देत होता. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली असता मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोपला.

हे ही वाचा :  Mumbai Sea Link Accident : वरळी सी लिंकवरचा ‘देवदूत’ गेला, बचावकार्य सुरू असतानाच भरधाव कारने उडवले

मात्र काही दक्ष नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना बजाजनगर येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेनंतर मॉब लिंचींगचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली होती.

आधी तरुणीची काढली छेड; मग पोलीस घरी येताच केला आत्महत्येचा बनाव

औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन मुलींच्या वस्तीगृहाजवळ मुलीची एका टवाळ पोराने छेड काढली. याबाबतची तक्रार पोलिसांकडे गेल्याचे कळताच तरुणाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला. त्यामुळे छेडछाडीचा कॉल सोडून क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतली. दरम्यान या घटनेने खळबळ माजली होती. परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच आत्महत्येचा बनाव करणाऱ्या तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना त्याने सगळेच सांगून टाकले.

जाहिरात

हे ही वाचा :  दुर्गामाता विसर्जना वेळी नदीला अचानक पूर 7 जणांचा मृत्यू थरारक LIVE VIDEO

सरस्वती भुवन मुलींच्या वस्तीगृहाजवळ 19 वर्षीय साईनाथ नावाचा तरुण मुलीची छेड काढत असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नोंद घेत तात्काळ त्याचे घर गाठले. तेव्हा साईनाथच्या खोलीत छताला साडी बांधलेली होती तर तो जमिनीवर झोपलेला होता पोलिसांना संशया आला त्याच्या अंगावर पाणी टाकले यामुळे पोलखोल झाल्याने तो घडा घडा बोलायला लागला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात