औरंगाबाद, 04 जुलै : वाढते नागरिकरण आणि आधुनिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात (air pollution) वाढ झालीय. वायू प्रदूषणामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. शुद्ध हवा घेण्यासाठी आता कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या एअर प्युरिफायरची मदत घ्यावी लागतेय. हे एअर प्युरिफायर (air purifier) सर्वसामान्यांना देखील परवडण्यासारखे नाहीयं. सर्वसामान्य नागरिकांना देखील एअर प्युरिफायरची शुद्ध हवा मिळावी, यासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या अभियांत्रिकेच्या 2 विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांना परवडेल असं एअर प्युरिफायर तयार केला आहे. (air purifier made by students) देवगिरी महाविद्यालयातील वैष्णवी गिरी आणि अहमद रजा यांनी हे एअर प्युरिफायर तयार केले आहे. अहमद रजा हा देवगिरी महाविद्यालयातील अभियांत्रिकीचा विद्यार्थी. अहमदला घरातून बाहेर निघतांच त्याला धुळीचा सामना करावा लागायचा. धुळीमुळे त्याला अॅलर्जी झाली. यावर उपचार करण्यासाठी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी त्याला काही मेडिटेशन आणि औषध गोळ्या डॉक्टरांनी दिल्या त्यासोबतच त्याला शुद्ध हवा घेण्याचा सल्ला दिला. यासाठी त्याला एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांचा सल्ला ऐकून अहमद रजा हा बाजारात एअर प्युरिफायर खरेदी करण्यासाठी गेला. यावेळी त्याला 20 हजारांपासून तब्बल 2 लाखांपर्यंत एअर प्युरिफायर दुकान चालकांनी दाखवले. अहमद रजा याची घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याने 50 हजार रुपयांचे एयर प्युरिफायर खरेदी केलं. एअर प्युरिफायर वापरल्यानंतर अहमदला जाणवत असलेला त्रास कमी झाला. धुळीच्या अॅलर्जीमुळे अहमदला शुद्ध हवेचे महत्त्व कळालं अनेक नागरिकांना या धुळीची अॅलर्जी असते. अनेकांना दमा देखील असतो. या रुग्णांना शुद्ध हवा गरजेची असते. मात्र, आधुनिकीकरणामुळे शुद्ध हवा मिळणं कठीण होत चाललंय. यामुळे कृत्रिम पद्धतीने शुद्ध हवा घेण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. मात्र, हे एअर प्युरिफायर बाजारामध्ये सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीये. यामुळे अनेक नागरिकांनाही खरेदी करता येत नाही. अहमद हा स्वतः अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्यामुळे आपण स्वतः समाजाची ही गरज भागवावी अशीच संकल्पना त्याच्या डोक्यात आली. ही संकल्पना त्याने शिक्षकांना सांगितली. त्याचीही संकल्पना ऐकून शिक्षकांनी त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी होकार दिला. वाचा :
BREAKING : एकनाथ शिंदे सरकार बहुमत जिंकले, राज्यात आता ‘शिंदेशाही’ …आणि पूर्ण झालं 1 महिन्यात एअर प्युरिफायर हा प्रोजेक्ट करण्याचे अहमद रजा आणि त्याची वर्गमैत्रिण वैष्णवी गिरी यांनी ठरवलं. यासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यासाठी त्यांनी बाजारात खूपदा फेऱ्या मारल्या. मात्र, काही वस्तू औरंगाबाद शहरात मिळाल्या नाही. त्यामुळे दोघांनी थेट दिल्लीहून काही वस्तू मागवल्या. एकूण साहित्यासाठी त्यांना 2 हजार 700 रुपये खर्च आला. एअर प्युरिफायर तयार करताना आलेल्या अडचणींसाठी त्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये एअर प्युरिफायर तयार केले. घरातील 200 - 250 स्क्वेअर फुट खोलीमध्ये हे एअर प्युरिफायर वापरता येऊ शकतो. एयर प्युरिफायरचे फायदे - एयर प्युरिफायरचा यात एक विशेष अँटीव्हायरस ग्रीन हेपा फिल्टर देखील दिलेले आहे. हे PM0.1 च्या आकाराचे 99.97% पोल्यूटेंट शुद्ध करू शकते. यामध्ये असलेल्या फिल्टरची जाडी 30 मिमी इतकी आहे. - एअर प्युरिफायर 0.3 मायक्रोन पर्यंतच्या छोट्या प्रदूषकांना सुद्धा फिल्टर करू शकते. - घरातील हाम्फुल केमिकल बाहेर काढून टाकतो. - दूषित हवा सुध्दा बाहेर काढून टाकते आणि चांगल्या प्रकारे सुगंध दरवळू लागतो. - एअर प्युरिफायर आयुर्मान वाढवते. वाचा :
आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात, 16 आमदारांसह होणार कारवाई, शिंदे गट घेणार का निर्णय? 2 हजार 700 रुपये खर्च आला हेपा फिल्टर एच 30, कार्बो फिल्टर, प्रे फिल्टर, युवी लाईट, फॅन, बॉडी इत्यादी साहित्य एअर प्युरिफायर बनवण्यासाठी लागले. यातील हेपा फिल्टर, कार्बो फिल्टर शहरात उपलब्ध नसल्यामुळे ते दिल्लीवरून मागवावे लागले. या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी 2 हजार 700 रुपये खर्च आला. हे एअर प्युरिफायर बाजारात 3 हजार 500 रुपयाला मिळेल.
कुठे मिळणार हे एअर प्युरिफायर? तुम्हाला हे एअर प्युरिफायर खरेदी करायचा असेलतर सुप्रीम प्रिंट पहिला मजला, डायमंड प्लाझा पैठण गेट येथे तुम्हाला घेता येऊ शकते. त्यासोबतच तुम्ही mohhammed.raza0@gmail.com ई-मेल आयडी आणि 9923188844 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.