औरंगाबाद, 15 जून : फोटोग्राफीमध्ये (Photography Course) करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमजीएम विद्यापीठांमध्ये फोटोग्राफी कोर्स (Photography Course in MGM University) उपलब्ध असून यामध्ये विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक शिकवण्यावर भर दिला जातो. दरवर्षी महाविद्यालयातर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फोटोग्राफीला खूप महत्त्वाचा आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. फोटोग्राफी क्षेत्राची व्याप्ती प्रचंड मोठी आहे, या क्षेत्रात अनेक संधी मिळत आहेत. यामुळे फोटोग्राफी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी फोटोग्राफीचे कोर्स केल्यास भविष्यात त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, यासाठी एमजीएम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून फोटोग्राफी कोर्सची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये विद्यार्थ्यांना फोटोग्राफीसहीत, टॉप कॅमेरा यांची हाताळणी देखील करायला मिळते. त्या सोबतच विद्यार्थ्यांना फोटोग्राफी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळत असते.
वाचा : Career Tips: हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका; करिअर बदलताना ‘या’ IMP गोष्टी ठेवा लक्षात
"फोटोग्राफी क्षेत्रामध्ये प्रचंड नोकरीच्या संधी आहेत. फोटोग्राफीचा क्षेत्र हे प्रचंड मोठे विस्तारलेला आहे. यामुळे फोटोग्राफी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन आपले करिअर घडवावे", असे मत फोटोग्राफी विभागाचे प्रमुख बैजू पाटील यांनी मांडले.
गुगल मॅपवरून साभार...
फोटोग्राफी कोर्स कसा कराल?
या कोर्ससाठी फोटोग्राफी डिप्लोमा इन डिग्री असून त्याचा कालावधी हा डिप्लोमा एका वर्षासाठी आणि डिग्री तीन वर्षांसाठी आहे. तसेच प्रमाणपत्र कोर्स 3 महिन्यांसाठी आहे. Photography@mgmu.ac.in या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज करू शकतात किंवा संपर्क साधू शकतात. या कोर्सची फी डिप्लोमाच्या एका वर्षासाठी 1 लाख 5 हजार रुपये आहेत. तसेच डिग्रीच्या तीन वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला 1 लाख 5 हजार रुपये हीच आहे. महात्मा गांधी मिशन कॅम्पस, संभाजी कॉलनी, मथुरा नगर, एन-6, सिडको, औरंगाबाद, महाराष्ट्र 431003, या विभागाचा पत्ता असून संपर्कासाठी 8806255507 यावर काॅल करू शकता.
कोर्स कुठे शिकायला मिळातो?
दहावी-बारावी पास असल्याची मार्कशीटची झेरॉक्स प्रत आणि त्यातही मार्क मेमो असायला हवा. डिप्लोमासाठी 20 विद्यार्थी तर डिग्रीसाठी 20 विद्यार्थ्यांची बॅच आहे. प्रवेश प्रक्रिया शेवटची तारीख 30 जुलै इतकी आहे. नोकरीपेक्षा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता. प्लेसमेंटसाठी निकोन, कॅनोन, सोनी 4G, गव्हर्मेंट जॉब त्यासोबत पत्रकारिता क्षेत्रातील संधी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News