औरंगाबाद, 22 डिसेंबर : नव्या वर्षाची चाहूल आता लागलेली असून त्याचवेळी 2022 मध्ये काय घडलं याची माहिती समोर येऊ लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 44 लाख 67 हजार 110 लिटर विक्री झाल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विक्रीमध्ये 18 लाख 13 हजार 739 लीटर इतकी वाढ झालीय. त्याचबरोबर अवैध दारू विक्री आणि ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं 800 गुन्हे दाखल केले आहेत. राज्यात अवैधरीत्या दारू विक्री करण्यास आणि अवैधिकरित्या दारू पिण्यास बंदी आहे. या प्रकारे दारू विकणारे ढाबे आणि तिथं येणाऱ्या तळीरामांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. या वर्षभरातात या प्रकरणात तब्बल 800 गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये 155 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 3 कोटी 34 लाख 70 हजार 60 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटी 45 लाख 54 हजार 142 रुपये एवढा जास्त आहे. Aurangabad : … तिच्या जागी पोलीस आले आणि रोड रोमियोची उडाली धांदल! ढाब्यावरती अवैध रित्या मद्य विक्री करण्यास परवानगी नाही. त्यानंतरही ही विक्री केली जाते. परवानगी नसताना दारू विक्री करणाऱ्या ढाबे मालकांवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 68 आणि 84 अंतर्गत मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू आहे.
नागरिकांना दारू पिण्याची इच्छा असेल तर त्यांनी परवाना असलेल्या ठिकाणाहूनच दारू विकत घ्यावी अन्यथा विक्री करणाऱ्या वर आणि विकृत घेणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिला आहे.