नाशिक, 4 मे : दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आता 11 महिलांसह 50 जणांवर चांदवड पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.
चांदवड तालुक्यातील मतेवाडी इथं श्रमदान करणाऱ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात हल्ल्यात भाऊराव चव्हाण (वय 55), संतोष बबन मते (वय 29), सुरेखा दगु मते (वय 35)आणि मुन्ना शहा (पोकलंड चालक) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हल्लेखोरांनी लोकांवर तर हल्ला केलाच शिवाय तेथील सहा ते सात मोटारसायकलही जाळून टाकल्या आहेत. तसंच पोकलंड मशीनच्या काचा फोडून नुकसान केलं आहे. हल्ला करणाऱ्या आदिवासींची संख्या जास्त असल्याने श्रमदान करणाऱ्यांनी तिथून पळ काढला.
दरम्यान, डोंगर उतारावर जमिनी कसणाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. पाणी फाउंडेशन उपक्रमाच्या अंतर्गत श्रमदान करणाऱ्यांवर हल्ल्या करण्यात आल्याची राज्यातील ही पहिली घटना मानली जात आहे.
VIDEO: कोकण रेल्वेचं एका सेकंदात बुकिंग फुल्ल, रांगेतील पहिल्या प्रवाशालाही मिळालं नाही तिकीट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Pani foundation