मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धुळ्यातल्या 12 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा

धुळ्यातल्या 12 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा

कमी आणि अनिश्चित पावसामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 गावांना 10 टँकरने पाणी पुरविले जात आह़े.

  धुळे, 10 एप्रिल : धुळे जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढत असून प्रशासनातर्फे, जिह्यातील 12 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कमी आणि अनिश्चित पावसामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 गावांना 10 टँकरने पाणी पुरविले जात आह़े.

  जिल्ह्यातील शिंदखेडा व धुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून फेब्रुवारी महिन्यापासूनच काही गावांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 276 गावांसाठी पाणी टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात शिरपूर साक्री तालुका वगळता धुळे व शिंदखेडा या दोन तालुक्यांमधील 12 गावांसाठी सध्या 10 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

  प्रशासनातर्फे जिल्ह्यातील 54 गावांमध्ये 45 विहिरी आणि 9 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात टॅंकर वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Dhule, Tanker, Water supply