मुंबई, 13 सप्टेंबर : महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. (Ashish Shelar Troll) भाजपचे नेते आशिष शेलार, अतुल भातखळकर, यांच्यासह राणे बंधु आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका करतात. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्ह ट्वीटरवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारला लावण्यात आलेल्या दंडाचा उल्लेख करत त्यांच्यावर आरोप केले पंरतु आशिष शेलार या ट्वीटवरून जोरदार ट्रोल झाले आहेत.
मागच्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड पुढच्या दोन महिन्यात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून आशिष शेलारांनी मुंबई महापालिका आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली परंतु या टीकेवर नेटकऱ्यांनी मात्र शेलारांचा चांगलंच सर्जीकल स्ट्राईक केले आहे.
हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 13, 2022
सांग सांग भोलानाथ...
हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून..
अडिच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून..
सोशल मिडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून...
वसूल करायचा का?
2/2
हे ही वाचा : राणा दाम्पत्याच्या अमरावतीच्या पोलिसांवरच गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
शेलारांनी ट्वीटमध्ये म्हंटल आहे कि, मग आता.. ‘सांग सांग भोलानाथ…हा दंड पालिकेमध्ये सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षे पर्यावरणमंत्री असलेल्यांकडून की, सोशल मीडियावर पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनेकडून वसूल करायचा का? असा प्रश्न उपस्थित करत, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचले आहे.
यावरून नेटकरी मात्र चांगलेच संतापलेले दिसत आहेत. यातील एका नेटकऱ्यांने म्हंटले आहे कि, जनाब आशिष शेलार उर्फ कुरेशी मियां…भाजपची दलाली करून लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे बंद करा आता… तुमचं पितळ उघडं पडलं आहे… तुम्ही कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मुंबईकर तुम्हाला तोंडावर पाडणार. कारण सगळ्यांना कळून चुकलं आहे.
अतुल भातखळकरही ट्रोल
मागच्या चार दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अंतर्गत यात्रा आयोजित केली आहे. राहुल गांधी हे कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विविध राज्यातून भारत जोडो यात्रा नेत आहेत. (Atul Bhatkhalkar) ते सध्या कन्याकुमारीतून केरळमध्ये आले आहेत.
दरम्यान त्यांच्या यात्रेच्या सुरूवातीलाच भाजपने त्यांच्यावर टीका करण्याचे सुरू केले आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्त्यूत्तर दिले आहे. यामध्ये भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. परंतु अतुल भातखळकर त्यांच्या ट्वीटर पेजवर सुरूवातील ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे.
हे ही वाचा : गद्दारांनी बापाच्या नावाऐवजी बाळासाहेब ठाकरेंचे नाव मध्ये लावावे आम्हाला वाईट वाटणार नाही
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत, 1971 साली राहुलजींच्या आजीने “गरिबी हटाव” चा नारा दिला होता. देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली, असी खरमरीत टीकाअतुल भातखळकर यांनी केली. यावर काँग्रेससोबत नेटकऱ्यांनी अतुल भातखळकर यांच्या ट्वीटर हँडलवर जोरदार पलटवार केला आहे.