'सत्याचा विजय होईल, मराठी माणसाने साथ द्यावी'; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन

'सत्याचा विजय होईल, मराठी माणसाने साथ द्यावी'; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन

अक्षता नाईक यांनी मराठी जनांना भावनिक आवाहन केलं आहे.

  • Share this:

रायगड, 9 नोव्हेंबर : 'सत्य आपोआप बाहेर पडतं. सत्याचा विजय होते. सत्यासाठी उभे रहा. मराठी माणसांनी पाठिमागे उभे राहावं,' असं भावनिक आवाहन अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केलं आहे.

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी वादग्रस्त पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. तसंच मुंबई हायकोर्टानेही त्यांचा जामीन फेटाळला आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक सत्र न्यायालयाच्या आवारात उपस्थित होत्या. यावेळी अक्षता नाईक यांनी मराठी जनांना हे भावनिक आवाहन केलं आहे.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप करत अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. तसंच नाईक यांच्या सुसाईड नोटमध्येही अर्णब यांचं नाव होतं. 2018 साली झालेल्या या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना काही दिवसांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाकडून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

'अर्णब आता कोर्टाच्या ताब्यात...'

'अर्णब गोस्वामी हा आता कोर्टाच्या ताब्यात आहे. भाजप इतकी उतावीळ झाली आहे, हे कळत नाही. राज्य सरकार आणि पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अर्णब गोस्वामी हा आता कोर्टाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांकडून त्रास होण्याचा प्रश्नच नाही. राज्यपाल हे एक राज्याचे सल्लागार आहे.त त्यांनीही नाईक कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. जे जेलचे नियम आहेत त्यानुसार अर्णब गोस्वामी यांना ट्रिट केलं जाईल. नियमामध्ये जे बसतं ते अर्णब गोस्वामी यांना मिळेल,' असं म्हणत या प्रकरणावरून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 9, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या