विशाल रेवडेकर, (सिंधुदुर्ग) 06 नोव्हेंबर : मागच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली होती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप व शिंदे गट आमनेसामने आले होते. पण, अंधेरीतील वारे पाहता भाजपने माघार घेतली. नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवला. दरम्यान या सगळ्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
अंधेरी पूर्वी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके निवडून आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रीया दिली. यावर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर टीका केली. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला. उद्धव ठाकरेसारखा संपलेल्या माणसाकडे मुख्यमंत्रीपद गेल्याने हा प्रकार झाल्याने नारायण राणे म्हणाले.
हे ही वाचा : अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, पतीच्या आठवणीने झाल्या भावुक
तसेच ऋतुजा लटके यांचा विजय हा अजून कागदोपत्री झाला नाही. त्यांनी आधी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे राणे म्हणाले. लटके यांनी हातात प्रमाणपत्र घेऊन विजयी झाले असे घोषीत करावे. आम्ही लटकेंना पाठींबा दिला आहे. यामुळे अजून पुढे खूप प्रक्रीया बाकी आहे. आम्ही आमची भुमीका स्पष्ट केली आहे. पुढे अजून येणारा काळ राजकारण ठरवेल असे ही ते म्हणाले.
मागच्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या निमीत्ताने खानदेश, विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सभांची परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे.
हे ही वाचा : अंधेरी निवडणुकीत 'नोटा'साठी भाजपने वाटले पैसे, दानवेंचा गंभीर आरोप
ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे हे संपलेली व्यक्ती त्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखं नसल्याचे म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. दरम्यान मागच्या काही वर्षांपासून कोकणात रिफायनरीचा मुद्दा पेटलेला आहे. यावर नारायण राणे यांनी रिफायनरी कोकणात ठरल्या जागेवरच होणार असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर काँग्रेसमध्ये किती गटबाजी आहे हे सगळ्यांना दिसून येईल असे राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Shiv Sena (Political Party), Sindhudurg, Sindhudurg news