अमरावती, 25 मार्च : गेल्या काही दिवसांपासून एका चुलीवरील बाबाचा Video व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमुळे चुलीवरील बाबा चांगलाच चर्चेत आला आलाय. या बाबाविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अनेकजण याविषयी प्रतिक्रिया देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदू महाराजचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, यामध्ये एक महाराज चक्क चुलीवरील तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये संत गुरुदास महाराज तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देताना शिवीगाळ सुद्धा करताना दिसून आले. मार्डी येथे संत गुरुदास महाराज यांच गौररक्षण असून तेथे त्यांच आश्रम आहेत. हेही वाचा - चुलीवरील बाबाचा Video व्हायरल, करामत पाहून लावाल डोक्याला हात हा व्हिडीओ व्हायरल होताच अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. या अनुशंगाने अंधश्रद्धा निर्मुलन समिती सचिव हरीश केदार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. महाराजांचा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्या समोर सिद्ध करावा. आम्ही 30 लाखांचं त्यांना बक्षीस देऊ नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हरीश केदार यांनी केली आहे.
चुलीवरील मटण, मिसळ, आईस्क्रीम नंतर आता मार्केट मध्ये चुलीवरील बाबा आलाय 🤣 pic.twitter.com/NPF3rR3eCU
— Pratik S Patil (@Liberal_India1) March 21, 2023
हे प्रकरण चर्चेत येताच चुलीवरील बाबा म्हणजेच संत गुरुदास महाराज यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली असता, सदर व्हिडिओ हा महाशिवरात्रीतला असल्याचा दावा त्यांनी केला तर मी कुठलेही अंधश्रद्धेचे काम करत नाही. मला देवी शक्ती प्राप्त होते त्यावेळी मला भान नव्हत तर मी अंधश्रद्धा पसरवत नाही हा श्रद्धेचा भाग आहे मी साधू संत नाही असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या बाबांच्या घटना समोर आल्या आहेत. लोकांना ठीक करणारे, त्यांच्या समस्या दूर करणारे, आजार पळवून लावणारे, अशा अनेक निरनिराळ्या घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. अशा बाबांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत.