जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'पटत नसेल तर उठून..' चालू भाषणात शिवव्याख्यात्याने भाजप खासदार डॉ. बोंडे यांना झापलं

'पटत नसेल तर उठून..' चालू भाषणात शिवव्याख्यात्याने भाजप खासदार डॉ. बोंडे यांना झापलं

चालू भाषणात शिवव्याख्याता अन् भाजप खासदाराची हमरीतुमरी

चालू भाषणात शिवव्याख्याता अन् भाजप खासदाराची हमरीतुमरी

अमरावती येथील एका कार्यक्रमात शिवव्याख्याते आणि भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांची हमरीतुमरी झाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 21 फेब्रुवारी : नुकतीच राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या औचित्य साधून अमरावती येथील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरकार्यक्रमात खासदार आणि शिवव्याख्यात्यांची हमरीतुमरी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. काय आहे प्रकरणी? यावेळी मंचावर भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे, प्रमुख वक्ते म्हणून तुषार उमाळे उपस्थित होते. यावेळी तुषार उमाळे शिवाजी महाराज यांची प्रतिमा मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले हे सांगत होते. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हस्तक्षेप करत म्हणाले ये शहाण्या हे बंद कर, त्यावर डॉक्टर अनिल बोंडे उठून उभे झाले. त्यावेळी वक्ते तुषार उमाळे यांनी तुम्ही मूर्ख आहात का? म्हणत लोकप्रतिनिधी असा किंवा कोणीही आगाऊपणा खपवून घेतल्या जाणार नाही. महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिला आहे. ज्याला ऐकायचं त्यांनी ऐका नसेल ऐकायचं तर चुपचाप निघून गेले तरी चालेल. हा प्रसंग सुरू असताना भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे उठले आणि स्टेज जवळ गेले यावेळी कार्यक्रमात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्त्यामध्ये शिवजयंती वरून पेटलेला हा वाद काही काळाने संपला. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दुकान व्हायरल होत आहे.

जाहिरात

दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी करणार : मुख्यमंत्री “दरवर्षी शिवजयंती आग्रा किल्ल्यावरच साजरी करायची,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. आग्रा किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरवर्षी शिवजयंती इथेच साजरी करणार असल्याचं म्हटलं.

News18लोकमत
News18लोकमत

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याने सगळीकडेच उत्साहाचं वातावरण होतं. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने आग्र्यातील लाल किल्ल्यावर (Red Fort) शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी हजारो शिवप्रेमी जमले होते. या खास कार्यक्रमासाठी औरंगाबादहून कार्यकर्त्यांची स्पेशल ट्रेन रवाना झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात