जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राष्ट्रवादीचा 'गेम', या जागेसाठी महाविकासआघाडी सोडून वंचितला पाठिंबा

राष्ट्रवादीचा 'गेम', या जागेसाठी महाविकासआघाडी सोडून वंचितला पाठिंबा

राष्ट्रवादीचा 'गेम', या जागेसाठी महाविकासआघाडी सोडून वंचितला पाठिंबा

महाविकासआघाडीमधला गोंधळ काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अमरावतीच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शिक्षक संघाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 24 जानेवारी : महाविकासआघाडीमधला गोंधळ काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. अमरावतीच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शिक्षक संघाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे. अमरावती विद्यापीठ राष्ट्रवादी शिक्षक संघाने पत्र देऊन हा पाठिंबा दिला आहे. महाविकासआघाडीकडून धीरज लिंगाडे हे निवडणुकीत उमेदवार असतानाही राष्ट्रवादीच्या शिक्षक संघाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, यामुळे महाविकासआघाडीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे, यामध्ये एकूण 23 उमेदवार रिंगणात आहे, यामध्ये प्रमुख लढत भाजपचे रणजीत पाटील, वंचितचे अनिल अमलकर तर महाविकासआघाडीचे धीरज लिंगाडे यंच्यात आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार रिंगणात असतानाही राष्ट्रवादीने वंचितला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे महाविकासआघाडीमधला अंतर्गत वाद समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या शिक्षक संघाने वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे याचा फटका महाविकासआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना बसण्याची शक्यता आहे. तर पक्षविरोधी पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या शिक्षक संघावर राष्ट्रवादी पक्षाकडून काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरून महाविकासआघाडीमधले वाद आधीच चव्हाट्यावर आले होते, त्यात आता अमरावतीमधल्या राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या भूमिकेमुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ महाविकासआघाडीने काँग्रेसला सोडला, त्यानंतर काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही, त्यांच्याऐवजी सत्यजीत तांबे अपक्ष रिंगणात उतरले, यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. अखेर काँग्रेसनं तांबे पिता-पुत्राचं पक्षातून निलंबन केलं आणि शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. महाविकासआघाडीने नागपूरची जागा शिवसेनेला सोडली होती, पण अखेरच्या क्षणी काँग्रेसने ही जागा मागून घेतली, त्यामुळे शिवसेनेला त्यांचा उमेदवार मागे घ्यावा लागला. यानंतर शिवसेनेकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात