अमरावती, 14 फेब्रुवारी : अमरावती शहरातील हमलपुरा येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. कैलास गणेश अजबे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
कैलास अजबे याने नुकतंच दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे दुसरं लग्न का केलं? असा प्रश्न कैलास अजबे याला त्याच्या भावाकडून विचारला जात होता. याच मुद्द्यावरून झालेल्या वादात कैलास गणेश अजबे याला आपला जीव गमवावा लागला आहे.
पहिली पत्नी असताना तिला मुलबाळ होत नसल्याने कैलासने दुसरे लग्न केलं होतं. या मुद्द्यावरून कुटुंबात तणावाचं वातावरण तयार झालं. रविवारी हा वाद टोकाला गेला आणि कैलासच्या भावाकडून नको ते घडलं. भावाने कैलासवर केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याने प्राण सोडले.
हेही वाचा - ऑनलाइन गेम्सच्या नादी लागून मुलं घरातून पळाली; मुंबईला जाणाऱ्या तिघांना नाशिकमध्येचं अडवलं
दरम्यान, या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदन करिता पाठविला असून या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.