Home /News /maharashtra /

Amravati: अमरावतीत पाण्यासाठी स्थानिकांनी सोडलं गाव, गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना, पाहा VIDEO

Amravati: अमरावतीत पाण्यासाठी स्थानिकांनी सोडलं गाव, गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना, पाहा VIDEO

अमरावतीत पाण्यासाठी स्थानिकांनी सोडलं गाव, गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना, पाहा VIDEO

अमरावतीत पाण्यासाठी स्थानिकांनी सोडलं गाव, गेल्या 28 दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना, पाहा VIDEO

पाण्यासाठी ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागले असल्याची घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती, 3 फेब्रुवारी : अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा असतात आणि त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण आता विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना आपले गाव सोडावे लागल्याचा धक्कादायक प्रकार (Shocking incident) उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात (Savangi Magrapur Village) ही घटना घडली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (People left village as they do not get water in Amravati) अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात वार्ड क्रमांक 1 मधील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गाव सोडले. या सर्व गावकऱ्यांनी गावाच्या वेशी जवळ ठिय्या आंदोलन पुकारले आहे. बुधवारी रात्रीपासून गावावर बहिष्कार टाकला आणि कडाक्याच्या थंडीत गावाबाहेर आंदोलन सुरु केले. जो पर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत आता मागेच हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
या ग्रामस्थांना गेल्या 28 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकेच नाही तर गावातील सरपंचांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. तबल 28 दिवसांपासून वार्ड नंबर 1 मध्येच ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह रात्रीपासून गावाबाहेरील विहिरीजवळ बसले आहेत. वाचा : नववधूने उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोट वाचून सर्वच हादरले आपल्या गावात पाण्याची ही समस्या गेल्या 20 वर्षांपासून असल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे. त्यातच आता ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. 28 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर गाव सोडण्याचा निर्णय घेतला. या गावातील अनेक नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत विहिरीजवळ बसले आहेत. यामध्ये वयोवृद्दांपासून लहान मुलांपप्यंत सर्वांचाच समावेश आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजच्या तारखेलाही अशाप्रकारे नागरिकांना पाण्यासाठी तडफडावं लागत आहे. हे वृत्त प्रसारित होताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सुनील वारे सावंगी मग्रापूर गावचा दौरा केला. सुनील वारे यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. तसेच पाईप लाईनच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Amravati, Maharashtra, Water

पुढील बातम्या