कॉलेज तरूणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, आईने पोलिसांवरच केला गंभीर आरोप

कॉलेज तरूणीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, आईने पोलिसांवरच केला गंभीर आरोप

हत्या प्रकरणात आईने पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती, 12 फेब्रुवारी : अमरावतीत प्रेम प्रकरणातून झालेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. कारण या हत्या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप करत आईने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ठाणेदार रवींद्र सोनोने यांच्यावरसुद्धा संशयाची सुई जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमरावतीतील एका महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकणाऱ्या  प्रणिता कोंबे या 18 वर्षीय तरूणीला गार्डनमध्ये नेवून तरुणाने भोसकून तिची हत्या केली होती. तिच्या हत्येनंतर आरोपी तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकला होता. ही धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात घडली होती. यामध्ये तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.

आता हे प्रकरण आता वेगळया वळणार गेले आहे 'जुलै 2019 ला माझ्या मुलीला आरोपीने फूस लावून पळवून नेले होते. तेव्हा दत्तापूरचे पोलीस ठाणेदार रविंद सोनोने यांनी  माझ्या मुलीचा शोध लावून 4 दिवसांनी परत आणले होते आणि तुम्ही पोलीस तक्रार करू नका, तुमच्या मुलीची बदनामी होइल असे सांगून कारवाई थांबवली होती. त्यामुळे हे प्रकरण चौकशी करिता आता सीआयडी कडे द्यावे,' अशी मागणी हत्या झालेल्या तरुणाच्या आईने अमरावती पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सेक्स रॅकेट अड्ड्यावर पोलिसांची रेड! भीतीनं 3 तरुणींची छतावरून उडी, एकीचा मृत्यू

दरम्यान, अमरावतीतील या हत्या प्रकरणात आईने पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर आता ठाणेदार रवींद्र सोनोने यांच्यावर सुद्धा संशयची सुई जात असल्याचं बोललं जात आहे.

First published: February 12, 2020, 4:09 PM IST

ताज्या बातम्या