जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार


अमित शहा यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्यानंतर आता सीआरपीएफने कडक पावलं उचलली आहे.

अमित शहा यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्यानंतर आता सीआरपीएफने कडक पावलं उचलली आहे.

महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) पहिल्यांदाच राज्यात येणार आहेत. मुंबईमध्ये आल्यानंतर अमित शाह लालबागच्या राजाचं (Lalbag Cha Raja) दर्शन घेणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) पहिल्यांदाच राज्यात येणार आहेत. मुंबईमध्ये आल्यानंतर अमित शाह लालबागच्या राजाचं (Lalbag Cha Raja) दर्शन घेणार आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम समोर आला आहे. 4 सप्टेंबरला रात्री अमित शाह मुंबईमध्ये येतील. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल. 5 तारखेला सकाळी 10 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जातील. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर 11 वाजता अमित शाह वांद्र्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतील, त्यानंतर 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शाह बैठक घेणार आहेत, तसंच फडणवीसांच्या गणपतीचंही ते दर्शन घेतील. फडणवीसांच्या घरातील बैठक झाल्यानंतर अमित शाह दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपतीला जातील. 3 वाजता विद्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर शाह 5 वाजता दिल्लीला रवाना होतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. देशातलं सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचं भाजपचं मिशन आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात