साताऱ्याचा शेतकरी अमेरिकन महिलेच्या प्रेमात पडला आणि वाट लागली, 40 लाख रुपये गमावले

भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक करायची आहे, असं सांगून सदर महिलेने या तरुणासोबत अश्लील चाळे केले.

भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक करायची आहे, असं सांगून सदर महिलेने या तरुणासोबत अश्लील चाळे केले.

  • Share this:
मुंबई, 3 नोव्हेंबर : साताऱ्यातील शेतकऱ्याचा अमेरीकन महिलेने हनी ट्रॅप केला असून अमेरीकन सैन्यात असल्याचे भासवून या परदेशी महिलेने भारतीय नागरिकाला लाखो रुपयांना गंडा घातला आहे. मी अमेरीकन सैन्यात मोठ्या पदावर आहे आणि आपल्याला भारतात मोठी आर्थिक गुंतवणूक करायची आहे, असं सांगून सदर महिलेने या तरुणासोबत अश्लील चाळे केले. तसंच लग्नाचे आमिष दाखवून या परदेशी अमेरिकन महिलेने फसवणूक केली आहे. मर्सि ग्रेस आणि साताऱ्यातील शेतकऱ्याची ओळख फेसबुकवर झाली. बघता बघता त्यांची घट्ट मैत्री झाली. मर्सि ही सध्या अफगानिस्तान येथे कार्यरत असून आपल्याकडे खूप पैसे आहेत, त्यापैकी 10 लाख डॉलर्सची भारतात गुंतवणूक करायची आहे. त्याकरता तुझी मदत हवी आहे, असं मर्सिने शेतकऱ्याला सांगितले होते. पण मर्सिचा हा सगळा बनाव होता. तिनं गोड गोड बोलून त्या शेतकऱ्याला तिच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला तब्बल 40 लाख रुपयांना गंडा घातला. नेमकी कशी झाली फसवणूक? मर्सि शेतकऱ्याच्या संपर्कात गेल्या अनेक दिवसांपासून होती. व्हॉट्सअॅपवर देखील त्यांचे बोलणे सतत सुरू होते. अचानक एक दिवशी शेतकऱ्याला मर्सिच्या मॅनेजरचा फोन आला आणि मर्सिने तुम्हाला 10 लाख डॉलर पाठवले आहेत, असं सांगितलं. इथेच सुरू झाली शेतकऱ्याच्या फसवणुकीची मालिका... या कामासाठी त्या अमेरिकन महिलेला 7 आरोपींनी मदत केली होती. या सातही आरोपींच्या मुसक्या दिल्ली येथून डोंगरी पोलिसांनी आवळल्या आहेत. अमेरिकन महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना खोटं नाटं सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम ही 7 जणांची टोळी करायची. सोशल मीडियावर मर्सि ग्रेस ही अमेरिकन महिला सतत अॅक्टिव्ह असते. एखादा मोठा मासा गळाला लागला की त्याला मर्सिने देशोधडीला लावलाच समजा. कारण अशाच प्रकारचे अनेक गुन्हे मर्सि आणि तिझ्या टीमवर दाखल आहे.त त्यामुळे सोशल मीडियावर कोणाशी ओळख करताना सावधानता बाळता नाही तर तुमचीही फसवणूक होऊ शकते.
Published by:Akshay Shitole
First published: